पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांना शिंदाड येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भरवला पेढा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०२/२०२३
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतिक्षेत गावात तसेच शेतातील गोदामात साठवून ठेवलेल्या कापसाची मोठ्याप्रमाणात चोरी झाली होती. ही चोरी झाल्यानंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल मा. श्री. आर. के. पाटील. व सहकाऱ्यांना सोबत घेऊन नऊ संशयित आरोपींना कटक करुन पुढील तपासासाठी पोलिस कस्टडी घेण्यासाठी पाचोरा न्यायालयात हजर केले होते. परंतु मा. न्यायाधीशांनी संशयित आरोपींना (एम.ही.आर) देत त्यांची जळगाव कारागृहात रवानगी केली होती.
पुढील तपास करण्यासाठी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चोरुन नेलेला कापूस कुठे लपवला आहे किंवा कोणत्या व्यापाऱ्याला विकला आहे. तसेच या अगोदर झालेल्या चोरींच्या घटनेत संबंधित चोरांचा हात होता की काय या तपासासाठी संशयित आरोपींना पोलिस कस्टडी मिळणे आवश्यक असल्याकारणाने पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी जिल्हा न्यायालयात अपीलात जाऊन संबंधित आरोपींना पोलिस कस्टडी मिळावी म्हणून विनंती केली होती. यावेळी सरकारतर्फे ॲड. सुनील यांनी जोरदार युक्तिवाद केला व तपासी पोलिस हेड कॉन्स्टेबल या. श्री. आर. के. पाटील. यांनी मुद्देसूद मांडणी करुन संशयित आरोपींना पोलिस कस्टडी मिळणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले. मा. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत संबंधित संशयित आरोपींना २७ फेब्रुवारी २०२३ सोमवार पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.
ही वार्ता शिंदाड गावात माहीत पडताच कापूस उत्पादक शेतकरी व सुज्ञ नागरिकांनी मा. न्यायालयाचे आभार मानले व पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांचे तोंड भरुन कौतुक करत आज दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ शनिवारी रोजी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब तपासी हेड कॉन्स्टेबल मा. श्री. आर. के. पाटील. सहाय्यक फौजदार विजय माळी, पोलिस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील, पोलिस शिलेदार जितेंद्र पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल शिवनारायण देशमुख तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना पेढा भरविला व आभार मानले आहेत.
महत्वाचे~
——
मागील काही वर्षांपासून या परिसरात शेतमाल, विद्युत पंप, शेती अवजारे व इतर किंमती वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार सुरुच होते. बऱ्याचशा वेळा पोलिस स्टेशनला तक्रारी दाखल करण्यात आल्या परंतु सबळ पुराव्याअभावी चोरटे सापडू शकेल नाहीत. व काही वेळा संशयित आरोपींना ताब्यात घेऊन कारवाईसाठी प्रयत्न केले मात्र कायद्यातील पळवाटा काढून आजपर्यंत हा प्रकार सुरुच होता. यामुळे सर्वसामान्य जनतेतून कायद्यावरचा विश्वास कमी होत चालला होता व पोलिसांच्या कामकाजाबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या परंतु आता पोलिसांनी अपीलात जाऊन संशयित आरोपींना पोलिस कस्टडी मिळवून ताब्यात घेतल्यामुळे हे सगळे आरोप व चर्चा पूर्णपणे थांबल्या असून जनतेतील गैरसमज दूर होऊन पोलिसांबद्दल विश्वासार्हता वाढीला लागली आहे.