आरोग्य विभाग व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा शहरात डेंग्यु आजार जनजागृती मोहीम सुरू
दिलीप जैन.
(पाचोरा) आरोग्य विभाग व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा शहरात डेंग्यु आजार जनजागृती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन पाण्याच्या टाक्या,पाण्याचे डबके फ्रिज ,कूलर ,घरातील झाडांच्या कुंड्या ,टायर ,नारळाची करवंटी आदींची तपासणी करून डासांची अंडी असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये अँबेट हे औषध टाकत आहे तसेच कोरडा दिवस पाळणे याविषयी आरोग्य शिक्षण देण्याचे काम आरोग्य कर्मचारी करत आहेत.
सदरची मोहीम ही मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर व जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती अपर्णा पाटील, ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील वैद्यकीय अधीक्षक, डॉ अमित साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून संपूर्ण शहरात डेंगू जनजागृती करण्यात येत आहे. या वेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, पाचोरा-भडगाव हिवताप पर्यवेक्षक माळी व आरोग्य सहाय्यक जी.एस.काकडे उपस्थित होते तरी नागरीकांनी सहकार्य करावे असे आहवान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.