लोहारा येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळा खोल्यांचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/११/२०२१
लोहारा येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेच्या नवीन १० खोल्या बांधकामासाठी पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. आज रोजी जिल्हापरिषद शाळा खोल्याच्या बांधकामाचे भूमिपूजन जि.प.सदस्य भाऊसाो मा. श्री. दिपकसिंग भाऊ राजपूत यांच्या हस्ते, शेतकरी सेनाचे जिल्हाप्रमुख मा.श्री. अरूण भाऊ पाटील, लोहारा येथील सरपंच भाऊसाो अक्षय भाऊ जैस्वाल, याच्या उपस्थित करण्यात आले.
या शुभ प्रसंगी राहुलशेठ कटारिया, ग्रा. प. सदस्य ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी,आबा चौधरी सुरेश मोरे,हिरालाल जाधव,अर्जुन डांबरे शिवसैनिक दिनकर गिते, लक्ष्मण बाविस्कर ,कौतिक शिंदे, संभाजी लिंगायत, सुभाष देशमुख पटेल सर, दिलीप गायकवाड, नाना डांबरे सुरेश भिल ईस्राईल शेख रज्जाक दादा गफ्फार मिस्तरी ईश्वर खरे भगवान खरे पत्रकार बंधू लोहारा गावातील नागरिक उपस्थित होते.