अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चा विभागीय कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न
दिलीप जैन. (पाचोरा)
सोयगांव तालुक्यातील किन्ही या गावांत काल ता.०४ रोजी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने *मराठवाडा विभागीय पदाधिकारी मेळावा* मोठ्या उत्साहात संपन्न झाला. निसर्गरम्य असलेल्या छोट्याशा किन्ही गावात पार पडलेल्या या मेळाव्याला मराठवाड्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दीपप्रजवलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यांवेळी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी मेळाव्यास उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना समितीची ध्येय धोरणे, विचारधारा यांबद्दलअमूल्य असे मार्गदर्शन केले. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती विविध प्रकारे भ्रष्टाचार करणाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड करून त्यांना त्यांची जागा दाखवत असते व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना जेलची हवा खाऊ घालते यांच्यासह विविध विषयावर खंडापूरकर यांनी प्रकाश टाकून समितीच्या वतीने आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवायांचे विश्लेषण यावेळी केले व आपल्या भागात होणारा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांना कळवा असे आवर्जून यावेळी सांगण्यात आले. आमची समिती भ्रष्टाचार थांबविण्यासाठी विविध मार्गाने कार्य करीत असते व अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सदैव तत्पर असते असेही प्रतिपादन त्यांनी यांवेळी बोलतांना केले.
मेळावा प्रारंभ होण्यापूर्वी विशेष आकर्षण म्हणून सोयगांव तालुक्यातील सुपूत्र व बनोटी परिसरातील सुप्रसिद्ध हास्य कवी सिद्धार्थ सोनवणे यांनी आपल्या कलाकारीतून 150 कलावंतांचे आवाज काढून उपस्थित असलेल्या नागरिकांचे मनोरंजन करीत उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांचेसहित व्यासपीठावर महिला प्रदेशाध्यक्षा राणीताई स्वामी, विभागीय अध्यक्ष बापूराव पाटील ढगे, महिला विभाग प्रदेश कार्याध्यक्षा संतोषी मोरे, ब्रिक्स मानव अधिकार युवती महिला प्रदेशाध्यक्षा पुजाताई निचळे, पी. आर.ओ. प्रमोद केंद्रे, अपंग सेलचे विभागीय अध्यक्ष काशिनाथ शिंदे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण देशमुख, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अंजनाताई राजपूत, जिल्हा सचिव सुनिल वैद्य, जिल्हा सरचिटणीस संदीप मानकर, औरंगाबाद कार्याध्यक्ष दुर्गादास अपार, मराठवाडा विभागीय युवक अध्यक्ष राहुल सोने, सोशल मीडिया अध्यक्ष शुभम पोपळघट, बीड जिल्हा पदाधिकारी गणेश पवार, सोयगांव तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील, सोयगांव तालुका उपाध्यक्ष प्रविण तायडे, उपाध्यक्ष श्रीराम पाटील, पत्रकार दिपक सावळे, किशोर पाटील आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमास गावातील नागरिकांसहित माता-भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष खंडापूरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी यांवेळी समिती मध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोयगांव तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस संदीप मानकर यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दशरथ वाढेकर, सुभाष वाढेकर, आदीकराव वाढेकर, मनोजसिंह बायस, शामराव वाघ, किशोर रोकडे, सुभाष गवळे, गणेश वाढेकर, मनोज पवार, अशोक नरवडे, किसन लाडके आदींनी विशेष मेहनत घेतली.