ॲड.किशोर राजपूत यांचे शेंदुर्णी येथील कार्यालयचा शुभारंभ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०४/२०२१
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील सगळ्यांचे सुपरिचित कायदेतज्ज्ञ स्टार18 न्युज चे कायदेशीर सल्लागार ॲड. मा.श्री.किशोर राजपूत यांनी आज चैत्री नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर शेंदुर्णी येथील बस स्थानक परिसरातील त्रिविक्रम महिला दूध डेअरीच्या मागील बाजूस आपल्या कार्यालयाचे उद्घाटन केले.
या कार्यालयाचे उदघाटनाचा कार्यक्रम आपल्या जिवाभावाच्या वडिलधाऱ्या मंडळीसह सहकारी मित्रांचे उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करयचा होता परंतु कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन शुभारंभाचा कार्यक्रम छोटेखानी पध्दतीने करुन घ्यावा लागला असे मनोगत ॲड.किशोर राजपूत यांनी व्यक्त केले.
तसेच उदघाटनप्रसंगी छोटेखानी कार्यक्रमात सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत उपस्थिती असलेल्या स्नेही जनांना मास्कचे वाटप करण्यात आले.
आपला व्यवसाय भरभराटीस..येवो अशा शुभेच्छा देत आपल्या हातून असहाय्य पीडीतांची सेवा घडो व सत्याची बाजू असणाऱ्यांना आपले कौशल्य कोर्टात पणाला लावून त्यांना न्याय मिळवून द्याल अशी आपेक्षा व्यक्त करत उपस्थित मित्रपरिवाराटडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या.