पाचोरा शहरात व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्टला सुरवात. पहिल्याच दिवशी २२९ पैकी १८ पॉझिटिव्ह.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०३/२०२१
राज्यातील जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या आदेशानुसार व काल प्रांताधिकारी कार्यालय येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार व प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिलेल्या आदेशानुसार येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारक येथे पाचोरा नगर परिषद, ग्रामीण रुग्णालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापाऱ्यांची रॅपिड टेस्टला सुरवात झाली.
काल दिनांक १३ मार्च शनिवारी पाचोरा तहसीलदार कैलासजी चावडे यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशी २२९ व्यापाऱ्यांची टेस्ट घेण्यात आली असता १८ जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळून आला आहे
या टेस्टला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे हुतात्मा स्मारक येथे व्यापाऱ्यांनी मास्क व सोशल डिस्टनसिंगचे पालन करत आपली टेस्ट करून घेतली टेस्ट केल्यानंतर लगेच रिपोट मिळत आहे यावेळी पाचोरा नगर परिषद चे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ,ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे,कर अधीक्षक डी एस मराठे,गजानन काकडे,भूषण काटे,आकाश खैरनार, प्रशांत बडगुजर, गोपाल लोहार,राजू लहासे,बापू ब्राह्मणे,विलास पाटील,राजेंद्र पाटील,आदी उपस्थित होते.
प्रशासकीय अधिकारी मा.श्री.प्रकाश भोसले
पॉझिटिव्ह लोकांकडून घरीच कॉरोंनटाईन राहण्यासाठी चे हमीपत्र भरून घेण्यात आले आहे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना ही टेस्टिंग साठी बोलविण्यात आलेअसल्याचे सूचना देण्यात देण्यात आल्या आहेत-ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे