महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं, संतोष पाटील.

*महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं*
__________________________
बापू तुम्ही म्हणाला होतात खेड्याकडे चला, कारण खेडे हेच राष्ट्राचे देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. तुम्हाला कळालं राष्ट्रहित खेड्यात होतं हे शंभर टक्के खरं होतं मात्र दुर्दैव त्या काळात संपूर्ण फोकस शहरांवर महानगरावर दिला गेला , तेथील उद्योग व्यवसाय शहरातील लोकांचे जीवनमान या सर्व गोष्टी कशा उंचावतील कशा प्रगतिपथावर जातील याचा विचार करून योग्य ते बदल करण्यात आले. आणि महानगराचा विकास म्हणजे देशाचा विकास अशी संकल्पना रुजवण्यात आली आणि इथेच खऱ्या अर्थाने खेड्यांचा ग्रामीण जीवनमानाचा दर्जा खालावला. ग्रामीण कृषी वैभव पूर्णपणे नेस्तनाबूत झालं कुठल्याच राज्यकर्त्याला विचारवंताला देशाचा कणा असलेल्या शेती व शेतकऱ्यांबद्दल गाव खेड्या बद्दल आस्था वाटली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुर्लक्षित राहिलेले खेडे आज स्वातंत्र्यातही न्यायासाठी तिष्ठत राहिलेल्या आहेत. तसे पाहिले तर गावाकडून खेड्याकडून सर्व गोष्टी शहरांकडे जातात दूध ,भाजीपाला, पाणी फळे अजून जगण्यासाठी लागतात त्या सर्व चीजा खेड्याकडून शहराकडे जातात, इतकाच काय ९० टक्के पुढारी गावाकडून महानगराकडे जातात मात्र शहरान कडून गावाकडे काहीच येत नाही.
प्रभाकर शेळके सरांच्या दोन ओळी आठवतात
*गावाकडे चला गावाकडे चला*
*नुसता बोल बाला*
*अन दुपारच्या गाडीनं*
*राजा मुंबईला गेला*
विकास शहरांचा होतो तो विकास गावखेड्यात कधीच येत नाही याला दुर्दैवा शिवाय काय म्हणावं, आज आपल्या जयंती निमित्ताने खूप काही गोष्टी मनामध्ये दाटून येत आहेत आणि प्रश्न पडतोय की खरंच आम्ही स्वतंत्र झालो आहोत का ?
संतोष पाटील
7666447112