*सरकारातील लोकांनो*
*बापाच्या गळ्याभोवतीचा दोर तोडा*
*मग लाखांच्या दहीहंड्या फोडा*
संतोष पाटील
—————————————-
श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत गोकुळातल्या घरामध्ये जाऊन टांगलेल्या शिंकाळ्याच्या मडक्यातील दही दूध खात असे, त्यासाठी मित्रांच्या साह्याने मानवी मनोरा करून वर चढून ते मडके फोडत असे, आजही ती परंपरा चालू आहे.
मात्र आता हे राजकीय पुढारी राजकारणाचा भाग म्हणून राजकीय स्टंट म्हणून दहीहंडी चे आयोजन करतात, या उत्सवाला धार्मिक अंग दाखवून गरीब दुबळ्या पोरांना बक्षसाचं गाजर दाखवतात व आमची दहीहंडी किती मोठी हे विरुद्ध पार्टीला दाखवण्यासाठी सर्व खटाटोप करतात, एखादी सिनेतारका, गायक, वलायकीत व्यक्ती ,आणून कार्यक्रमाची शोभा वाढवून गर्दी जमा करतात, खरं म्हणजे महाराष्ट्रातील तरुण पोरं दहीहंडी, गणपती, भंडारे, दुर्गा उत्सव, नेत्यांचे वाढदिवस, या गोष्टींमध्ये गुंतून स्वतःच आयुष्य करियर समाप्त करून घेतात, काल-परवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाला विम्याचे कवच देण्याची घोषणा केली आणि दहीहंडीला खेळाचा दर्जा जाहीर केला, हे सगळं ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीचा, शिक्षणाचा, भाकरीचा, प्रश्न सोडणारी योजना अमलात आणली पाहिजे वाढती बेरोजगारी, हाताला काम नाही, महाग झालेल शिक्षण, व्यापार करायला पैसे नाही, कर्जबाजारी झालेला शेतकरी बाप विकलांग झालेली जनता ,या गोष्टीवर काम करायला खूप वाव असताना हे लोक काय करत आहेत काहीच कळत नाही, कालच्या अधिवेशनामध्ये अजित दादा म्हणाले शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा गंभीर विषय आहे अजितदादांच्या कार्यकाळात हा प्रश्न इतकाच गंभीर होता, मात्र त्यांना शहाणपण सुचलं नाही जेव्हा आपण सत्तेत असतो तेव्हा शेतकऱ्यांना लाथाळायचं सत्ता गेली विरोधी बाकावर बसायची वेळ आली की शेतकऱ्याबद्दल प्रेम अस्था व्यक्त करायचं,हे आशा लोकांमुळे गरीबाची शेतकऱ्यांची, दीनदुबळ्यांची वाईट अवस्था निर्माण झालेली आहे ,शेतकऱ्यांच्या विरोधात काही जीवघेणे काळे कायदे आहेत काही चुकीचे ध्येयधोरण आहेत, त्या गोष्टीबद्दल विचार करा त्यांच्या गळ्याला लागलेला फास सोडवण्याचा प्रयत्न करा, मित्रहो एकीकडे मडकं टांगून दहीहंडी फोडतात इथे तर चक्क बापाचा मुंडक दहीहंडी सारखं झाडाला लटकत आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी कुठली व्यवस्था नाही कुठले सरकार नाही, कुणालाच ह्या गोष्टी कळत नाही , या देशात महाराष्ट्रात धोक्याचं ,गद्दारांच राज्य वाढत चाललं सगळीच गुंड आमदार म्हणून निवडून आले आहे, संपूर्ण तालुक्यावर मतदार संघात त्यांचा वचक आहे जरासे कोणी त्यांचे विरोधात काही बोललं तर कायद्याचा, गुंडांचा धाक दाखवला जातो, कायदा सुव्यवस्था गुंडांच्या दावणीला बांधली केली आहे ,या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये अराजकता माजलेली आहे, सत्तेतला असो विरोधातला असो कुठलाही नेता असो त्याच्या पोटाखाली केलेले कार्यकर्ते नेत्यांचा जयजयकार करत असतात, म्हणून नेते मूर्खांच्या नंदनवन जगतात आणि आपल्या सोबत संपूर्ण देशाचा सत्यनास करतात, माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एक विनंती करतो आधी झाडावर लटकलेला बाप व त्याचे प्रश्न सोडवा आणि मगच लाखांच्या दहीहंड्या फोडा, नाहीतर या महाराष्ट्रातील तरणीबांड शेतकऱ्यांची पोरं तुम्हाला फोडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा..
संतोष पाटील
7666447112