माझी कविता,सौ गीतांजली कोळी. धुळे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०८/२०२२

माझी कविता.

भावविभोर अश्रू
पापण्या लपलपल्या
काळोखात जणू
मिणमिणत्या पणत्या
थरथरल्या…

उदास मन माझे
कुठे ढळलेले
कुणा न कळलेले …
स्वप्न जपतांना
माझे च घाव शुलांचे
पायात असंख्य
रूतलेले…

मनाच्या वेदना
असह्य विण्हळलेल्या
जणू आक्रोशून
खळवळून
सागर उसळलेला…

वेदना चिकटून
विकट हासल्या
शब्दाच्या वाकुल्यातून
अदृश्य स्पर्शील्या…

घनघोर वादळात
पंख कापलेले
मिटलेले डंख
पुन्हा टपटपलेले…

उडतांना वावटळांची
धुळ उडते अनंत
अडवणा-या घोंघावाताची
अनामिक खंत… 🥀

कवियत्री-✍️
सौ गीतांजली कोळी. धुळे
२१/०८/२०२२
आज कविता दिनानिमित्त