बांधावर वाढलेले कवितेचं झाड,म्हणजे कवी मा.श्री. प्रभाकर शेळके.
दिनांक~१५/०१/२०२२
बांधावर वाढलेले कवितेचं झाड,म्हणजे कवी मा.श्री. प्रभाकर शेळके.
कवी महानोर दादा यांचे मानसपुत्र, आंबेवडगावचे सुपुत्र, मा.श्री। प्रभाकर धनाजी शेळके, म्हणजे कवी शेळके सर यांचा आज वाढदिवस, आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर अनेक कवितांचे कार्यक्रम करून स्वतः नाव उज्वल करता, करता आपल्या गाव खेड्याचं नावही आजरामर केलं. कवितेच्या विश्वामध्ये सरांचा नाव आदराने घेतलं जातं.
सरांची कविता दिनदुबळ्या शोषित गावगाड्यातील शेतकऱ्याची व्यथा मांडणारी अलवारपणे आपली भावना व्यक्त करणारी अशी हि साजूक कविता, कधीकधी शिकलेल्या सुशिक्षित बेरोजगाराची कथा सांगणारी तर कधी प्रेमाचा वर्षाव करणारी, अशा वेगवेगळ्या भूमिका घेऊन जन्माला येणारी कविता सर लिहीत आलेले आहेत. आतापर्यंत सरांची दोन पुस्तके येऊन गेली आहेत तिसरे येण्याच्या मार्गावर आहे *उजळू दे खेडीपाडी*, *ढासळलेल्या भिंती, अंगामी* *काहिली चे उन्हे* याच्या नंतर अनेक वृत्तपत्रातून मासिकांमधून सरांच्या कविता प्रकाशित झालेले आहेत.
खऱ्या अर्थानं कविता जगलेला हा माणूस काळ्या मातीशी संघर्ष करता, करता भाकरीच्या प्रश्नाच्या शोधात गाव सोडून परगावी जाऊन राहतो. शिक्षकाची नोकरी करत असतांना आपण समाजाचं, विद्यार्थ्यांचं, काहीतरी देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवून ज्ञानदानाचे कार्य करून साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःच्या नावाचा वेगळा ठसा उमटवला. स्वतःचे नाव साहित्य क्षेत्रामध्ये उज्वल करतांना इतरांनाही कसे सोबत घेऊन जाता येईल याचा सतत विचार करत हा शब्दांचा धनी मानसन्मानाचा धनी कधी झाला कळलंच नाही.
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी आल्यानंतर शेतामध्ये रमायचे गडी माणसांशी बोलता-बोलता गुराढोरांशी रानपाखराशी सर बोलायचे, आणि केळी आंब्याच्या झाडाखाली बसून कविता म्हणायचे तेव्हा मला फार अप्रूप वाटायचं, नेमका हा माणूस कोण कुठून आला काय म्हणतोय कशासाठी गातोय आणि संपूर्ण जगाचं दुःख शेतकऱ्याचं दुःख या माणसाला कसं मांडता येते. सरांशी ओळख झाली आपलेच आहे हे कळल्यावर आनंद झाला, आणि माझ्यासारखा एक अल्पशिक्षित माणूस सरांच्या संगतीन लिहिता झाला, बोलता झाला ,अंतरीची वेदना कागदावर मांडण्याची पद्धत समजून घेऊन मी हळूहळू व्यक्त होऊ लागलो तेव्हा माझी कविता एखाद्या मासिकांमध्ये छापून यायची तेव्हा सरांचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा ,असा हा कवितेचा बादशहा आवाजाचा शहेनशहा पितृतुल्य व्यक्तीमहत्त्व शेळके सर यांचे सामाजिक ,मानसिक शारीरिक, साहित्यिक, आर्थिक, आरोग्य चांगले राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
सर आपणास वाढदिवसाच्या पुनश्च वावर भरून शुभेच्छा.
🙏🙏🎂🎂🙏🙏
भवतु मंगलम् तव जन्मदिनम्
चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनम्
चिरंजीव कुरु यशोवर्धनम्
विजयी भव सर्वत्र सर्वदा
जगति भवतु तव यशोगानम्
जीवेत शरद: शतं,
दीर्घायुरारोग्यामस्तु
शुभंभवतु…!!!
संतोष पाटील
7666447112