मैत्रीचा फायदा घेत भरवशावर पैसे न देता शेत जमीन खरेदीत करुन, मित्रानेच कापला मित्राचा केसाने गळा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०५/२०२२
मैत्रीचा फायदा घेत भरवशावर पैसे न देता शेत जमीन खरेदी करुन घेत ठरलेल्या वायद्यानुसार पेसे देत नसल्याची घटना पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावात घडली असून या फसवणूकीबाबात लवकरच भांडाफोड होणार असल्याचे समजते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावातील प्रतिष्ठीत म्हणून ओळख निर्माण केलेल्या शेतकरी व व्यवसायीकाने एका जवळच्या मित्राकडून व्यवसाय करण्यासाठी शेत जमीन घेऊन सौद्यापोटी मैत्रीचा फायदा घेत फक्त थोडीफार ऍडव्हान्स रक्कम देऊ विश्वास संपादन करत उर्वरित रक्कम न देताच शेत जमीन खरेदी करुन घेतली.
तदनंतर मात्र उर्वरित रक्कमेची मागणी केल्यानंतर ती रक्कम देण्यासाठी वेगवेगळे बहाणे करुन टाळाटाळ करत असल्याचे शेत मालकाला अनुभवायला येते असल्याने संशय बळावल्यावर संबंधित शेत मालकाने शेत जमीन विकत घेणाऱ्या सोबत वारंवार पैशाची मागणी केली असल्याचे पूरावे भ्रमणध्वनी संभाषण संग्रहीत ठवले असून आजपर्यंत दिलेल्या आश्वासनांची खैरात पुराव्यासाठी राखुन ठेवलेले आहेत.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित पिडीत व गरजू शेतकरी पुराव्यानिशी लवकरच कायद्याच्या मदतीने आपले बुडीत पैसे घेण्यासाठी तक्रार दाखल करणार असल्याचे जनमानसात चर्चेत आहे.
विशेष म्हणजे एका प्रतिष्ठित व्यक्तीने फसवणूक केल्याप्रकरणी जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.