जागृती विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०७/२०२२
पाचोरा येथील जागृती विद्यालयात दिनांक २३ जूलै २०२२ शनिवार रोजी बाळ गंगाधर टिळक (केशव गंगाधर टिळक) भारतीय सेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते, लोकमान्य टिळक या उपाधीने ज्यांचा उल्लेख केला जातो यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगू लोकमान्य टिळकांच्या जीवनातील काही प्रसंग सागितले व जीवनाविषयी मनोगत व्यक्त केले.
तसेच शाळेतील शिक्षक बागुल सर, जेष्ठ शिक्षक पवार सर यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळक यांचे आदर्श व्यक्तिमत्व व दीपस्तंभ कसे असते तसेच लोकमान्य टिळकांचा जीवनपट सांगुन परिचय करून दिला. मुख्याध्यापक सावंत सर यांनी जयंती आणि पुण्यतिथी का साजरी करावी याचे महत्त्व विशद करत, लोकमान्य टिळकांचा बाणेदार जीवन परिचय करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. आर. पाटील सर यांनी केले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
तसेच दिनांक २२ जूलै २०२२ शुक्रवार रोजी जागृती विद्यालयात विवेक वर्धनी नागरी पतसंस्था पाचोरा यांच्या सहकार्याने पतसंस्थेचे चेअरमन श्री. सदाशिव आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना,:शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव भैय्यासाहेब श्री. योगेश पाटील. भाजपा तालुका अध्यक्ष व युवानेते श्री. अमोलभाऊ शिंदे, मॅनेजर श्री. धर्मेश भैय्या अग्रवाल, मा. मुख्याध्यापक श्री. आर. एस. वाणी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.