भारत पेट्रोलियम पनेवाड़ी येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वि जयंती उत्साहात साजरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०२/२०२२
भारत पेट्रोलियम पनेवाड़ी येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढून ढोल, ताशांच्या गजरात कंपनीचे मुख्य व्यवस्थापक मा.श्री. प्रशांतजी खर्गे साहेबांच्या हस्ते श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन रक्तदान शिबीराला सुरवात करण्यात आली. या शिबिरात ४३ रक्तदात्यांंनी रक्तदान केले. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रा.मा.श्री. प्रशांत कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुने म्हणून योगेशजी अत्तरडे साहेब,संजय शिंदे,वसंत पवार, अशोक महाले, भुवनेश दुसाने व् सर्व सुरक्षा रक्षक, कर्मचारी व् सर्व ट्रांसपोर्टर हे उपस्थित होते. सदरिल कार्यक्रमाचे आयोजन योगेश आहेर,रवींद्र कोल्हे,गणेश पगार,भावराव गीते, मणिक शिंदे, यांंनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास वाबळे, किरण पवार,सौरभ खिल्लारे, दत्तात्रय सदगिर,पप्पू कांदळकर, नितिन बनकर,सचिन शिरसाठ, सचिन चौधरी सागर चौधरी, संतोष विंचू श्रीकांत पावर, श्रीकांत कदम व् सर्व चालक मालक व् वाहक यांनी विशेष परिश्रम घेतले.
यानंतर येथून मोटरसायकल यात्रा काढत मनमाड येथे छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळास पुष्पहार घालून आभिवादन करण्यात आले
सूत्रसंचालन व् आभार मनोज ससाणे यांनी मानले