गोराडखेडा येथील महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमित्ताने संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. ही संगीतमय श्रीमद् भागवत कथा ह.भ.प.मुकेशजी महाराज यांच्या सुमधूर वाणीतून ऐकण्याचे सौभाग्य गोराडखेडा व पंचक्रोशीतील जनतेला मिळेल.
या संगीतमय भागवत कथेच्या कथेच्या तिसऱ्या चरणात परीक्षित राजा व संबंधित घटनांचे वर्णन करत कलियुगामध्ये वाढत गेलेले दुष्कृत्य, धार्मिक परंपरांची अनास्था, समाजाप्रती व नात्याप्रती दुरावलेला प्रेमभाव याचे वर्णन करत विविध सामाजिक दाखले देत कथेचे विवेचन करण्यात आले. त्यासोबतच शंकर पार्वती विवाह सोहळ्याचे सखोल वर्णन करत विवाह सोहळा सजीव देखावा साकारण्यात आला.
याप्रसंगी गावातील एका नवविवाहित दाम्पत्याने शिवपार्वतीची वेशभूषा करुन देवगण व भूतगण अश्या भुमिका साकारुन भाविक, भक्तांची मने वेधून घेत आपल्या संस्कृतीची आठवण करुन देत आपल्या आयुष्यात सत्संग किती महत्त्वाचा आहे हे ह.भ.प.मुकेशजी महाराजांनी आजच्या तरुण पिढीला पटवून दिले. या संगीतमय श्रीमद् भागवत कथेच्या व शिवपार्वती
या प्रसंगी गावातील नवविवाहित दाम्पत्याने शिव पार्वतीची भूमिका घेत वऱ्हाडी म्हणून इतर देवगण व भूत अशा पात्रांच्या माध्यमातून शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी या सोहळ्याचा आनंद घेत शिवपार्वती विवाह सोहळाचे तसेच भजन संगीताच्या वेळी टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका घेत या संगीतमय श्रीमद् भागवत कथेचा आनंद लुटला.