३० मार्चला कुसुंब्यात २७ दिगंबर जैन तपस्वींचे आगमन व भव्य स्वागत.
गौरव जैन.(कुसुंबा)
दिनांक~२८/०३/२०२२
*जैन मंदिराच्या पटांगणात शिलान्यास समारोह*
कुसुंबा येथे दिनांक ३० मार्च २०२२ बुधवार रोजी सायंकाळी चार वाजता नेर मोराणे मार्गे विशाल संघ असलेले सा-या विश्वाचे लक्ष वेधून घेणारे महानतपस्वी वात्सल्य मूर्ति आचार्य शांतीसागरजी महाराज यांचे पंचम पट्टाचार्य महामूनीश्री दिगम्बराचार्य प.पू. श्री १०८ वर्धमान सागरजी मुनीश्री सह महाराज, आर्यिका माताजी असे २७ तपस्वींचा नगरात आगमन प्रसंगी भव्य स्वागत कुसुंबा अहिंसा प्रेमीतर्फे करण्यात येणार आहे.
त्यासाठी पद्मावती युवामंचने अथक परिश्रमाने स्वागत, भव्यशोभा यात्रा, शिलान्यास समारोह आदि धार्मिक कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्णत्वास नेली असून युवामंच समवेत कुसुंबेकर स्वागतास सज्ज झाले असल्याची माहिती प्राचीन श्री. १००८ कुंथूनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त व खान्देश जैन समाजाचे प्रसीध्दी प्रमुख व खान्देश जैन पत्रकार सतीश वसंतीलाल जैन (कुसुंबा-धुळे) तसेच महेंद्र हिरालाल जैन विश्वस्तांनी दिली.
पूज्यश्री आगमन आनंद उत्सवामुळे नागपूर सुरत रोड तर नगरातील विर महामार्ग ते अनिल महादू चौधरींचे विद्यालय पर्यंत दुतर्फा रांगोळी तसेच स्वागत बोर्ड आदिने सजावण्यात आले असून मंदिर परिसर विद्युत रोषणाईने झगमाट तसेच विशाल मंडप , पुज्यश्रींचे आसन व्यवस्था , कापडणा, कुसुंबा , कुंथूनाथ ध्वनी वाद्यांच्या स्वरात भव्य दिव्य स्वागत समारोहासाठी व भव्य शोभा यात्रेसाठी नगराच्या पश्चिमेला हिरासन पुलाच्या पुढे भाविकांनी उपस्थित राहवे तेथून विविध वाद्यांच्या गचरात जयघोषात शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गावरून निघेल आणि शोभायात्रा क्षेत्राच्या विशाल मंडपात समापनानंतर प्रवचन सभेत रुपांतर होईल.
नंतर क्षेत्राचे जिर्णोध्दार काम पूज्यश्री सहसंघ पहाणी नंतर प्राचीन क्षेत्र ३६×६५ फुट असलेले क्षेत्रापैकी निम्मे काम तन, मन, धनाने प्रतिष्ठाचार्य प्रदिपमधुर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने व पद्मावती युवा मंचच्या विशेष परिश्रमाने पूर्णत्वास आले असुन आता पुढील भाग या शुभ मंगल प्रसंगी आचार्य वर्धमान सागरजी महामुनी श्रीच्या उपस्थितीत शुभहस्ते सहसंघाच्या उपस्थितीत शेकडो भाविकांच्या जयघोषात प्रतिष्ठाचार्य प्रदीपशास्रीच्या रंगमंडप आणि श्रृंगार चौक सभा मंडपाचे शिलापूजन कार्यक्रम होईल रात्री महाआरती, वैयावृत्ती , स्वाध्याय, भक्तीगीताने कार्यक्रमाचे प्रथम दिवसाचे समापन होईल. प्रतिष्ठाचार्य प्रदिपकुमार जैन, महेंद्र जैन, वालचंद जैन, पारस जैन, श्रुतकुमार जैन, मयुर जैन, स्वप्नील जैन, पंकज जैन, रोशन जैन, विपुल जैन, राहुल जैन, राजु जैन, चंद्रकांत जैन, वर्धमान जैन, रिखब जैन ओम जैन प्रतिक जैन, पद्मावती युवा मंच कुसुंबा आदी परिश्रम घेत आहेत..