सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

सांस्कृतिक
Home›सांस्कृतिक›शिवरायांचे विचार आचरणात आणण्याची गरज- शिवश्री पंकज रणदिवे.

शिवरायांचे विचार आचरणात आणण्याची गरज- शिवश्री पंकज रणदिवे.

By Satyajeet News
February 22, 2022
99
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०२/२०२२

पाचोरा येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवजन्मोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. दिनांक २१ रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान झालेल्या या ऑनलाईन व्याख्यानमालेला चाळीसगाव येथील शिवव्याख्याते पंकज रणदिवे यांनी “शिवराय- शिक्षण व संस्कार” या विषयावर आपले विचार व्यक्त केले. शिवरायांचे फोटो, बॅनर तसेच शिवरायांसारखा पेहराव मिरवणे महत्त्वाचे नसून शिवरायांचे संस्कार व विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे परखड मत वक्ते पंकज रणदिवे यांनी यावेळी व्यक्त केले.

शिवश्री पंकज रणदिवे यांनी
स्वराज्याच्या राजमुद्रे वरील मजकुराचे विश्लेषण करताना सांगितले की, स्वराज्य स्थापन करतानाच लोककल्याणकारी राज्य निर्मितीचा महाराजांचा उद्देश होता, हे सिद्ध होते, स्वराज्य हे सर्वांचे राज्य आहे, ही भावना लोकांमध्ये निर्माण करून मी या राज्याचा उपभोगशून्य स्वामी आहे, हे आपल्या कर्तृत्वातून छत्रपतींनी वेळोवेळी सिद्ध केले आहे.

आजच्या समाजापुढील आव्हाने वेगळी आहेत ,आमच्या समस्या आज वेगळ्या आहेत ,सद्य परिस्थितीतील युद्धाचे स्वरूप बदललेलं आहे. आता युद्धासाठी तलवार वापरायची नसून ज्ञान व पुस्तके हे युद्धाचं साधन आणि बुद्धी हे तंत्रज्ञान म्हणून वापरण्याची गरज आहे. आजच्या अराजकतेच्या वातावरणात स्वराज्यातील व्यवस्था व प्रशासनाची आवश्यकता आहे.
दक्षिण भारतातील सर्वात मातब्बर श्रीमंत आणि समृद्ध सरदार असणाऱ्या शहाजीराजांचे पुत्र असलेल्या शिवरायांच्या पायाशी सर्व सुखं लोळण घेत असताना, रयतेच दुःख पाहवले नाही म्हणून जिजाऊ आईसाहेबांच्या मार्गदर्शनाने , स्वतः दुःख व त्रास सहन करून लोकांच्या कल्याणासाठीचं राज्य निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं.

धर्माचा अहंकार व अधिनिवेष असू नये हा महाराजांच्या संस्कृतीचा एक भाग होता हे स्पष्ट करताना रणदिवे म्हणाले की, अनेक दर्गाह आणि मस्जिदिंसाठी महाराजांनी देणग्या दिलेल्या आहेत, ख्रिश्चन मिशनऱ्यांना मदत केलेली आहे. यावरून सर्व धर्मांप्रति समभाव आणि सन्मानाची भावना महाराजांमध्ये दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करणे, घराघरांमधून मोठे फोटो लावणे, रस्त्यावरून जणू पोस्टर्सची  स्पर्धा लागली आहे. असा भास व्हावा हे सारे काही आपण करतोय, ठीक आहे. पण यासोबतच शिवरायांचे विचार आचरणात आणण्याची आणि चारित्र्यसंपन्न जीवन जगण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे असे विचार शिवश्री पंकज रणदिवे सरांनी यावेळी मांडले.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे पाचोरा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी आभार प्रकटन केले महासंघाचे चिटणीस शिवश्री चंद्रकांत पाटील यांनी व्याख्यानाचे सूत्रसंचालन केले या व्याख्यानाला शितल अकॅडमी व टायगर किड्स चे संचालक प्रा रोहन पाटील सर यांचे तंत्र सहाय्य लाभले
दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ मंगळवार चे व्याख्यान
वेळ- सायंकाळी ६ ते ७ वाजता
विषय- युवक व रोजगाराच्या संधी
वक्ते- शिवश्री गोपाल दर्जी,जळगाव

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 44
Previous Article

सातगाव डोंगरी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, वनविभागाचे ...

Next Article

पिंपळगाव हरेश्वर येथे विविध उपक्रम राबवून छत्रपती ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्रसांस्कृतिक

    समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार जाहीर.

    December 13, 2020
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    आज विसुसावि परिवारातर्फे “अमृत महोत्सव आईचा” या सोहळ्याचे आयोजन.

    February 9, 2024
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    आदिवाल परिवाराचा ०८ नोंहेबर रोजी पाचोरा येथे धम्म दिक्षा घेण्याचा ऐतिहासिक व परीवर्तवादी निर्णय.

    October 15, 2022
    By Satyajeet News
  • राष्ट्रीयसांस्कृतिक

    महा सूर्याचा अस्त कधीच होत नसतो!! ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे .

    December 5, 2020
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    सावता ने केला मळा, विठ्ठल देखीयेला डोळा* म्हणत कुऱ्हाड येथे सावता महाराज पुण्यतिथी साजरी.

    July 27, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    खाकी वर्दीचा सन्मान पोलीस विनोद अहिरे यांची राज्यस्तरीय कविसंमेलनाध्यक्षपदी निवड.

    August 12, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • पाचोरा तालुका.

    सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा वाद आता आमदारांच्या दालनात. उद्या होणार दुध का दुध पाणी का पाणी.

  • पाचोरा तालुका.

    सावित्रीच्या लेकींना वेळेवर बस उपलब्ध करुन द्या अन्यथा स्वातंत्र्यदिनीच उपोषणाला बसणार. शांताराम बेलदार.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज