१५ जून पासून सुरु होणाऱ्या मांगीतुंगीतील जैन कुंभमेळाव्याची जय्यत तयारी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०५/२०२२
नाशिक व धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीवर तर कुसुंबा येथुन ८० किलोमीटर अंतरावर असलेले अनेकांचे श्रद्धास्थान गगनचुंबी मांगीतुंगीजी सिद्धक्षेत्र येथे आजच्या सहावर्षापूर्वी जगातील सर्वात उंच असलेली भगवान ऋषभदेव (भगवान आदिनाथ) अखंड पाषाणात कोरलेल्या १०८ फुटांची मूर्ती (खडगासन) सर्वोच्च साध्वी भारत गौरव असलेल्या तपस्वी परमपूज्य ज्ञानमती माताजी यांच्या मंगल आशीर्वादाने व प्रेरणेने साकारण्यात आलेल्या या महामूर्तीचा सहावर्षानंतर प्रथमच १५ जून पासून सुरु होणाऱ्या महामस्तकाभिषेक महोत्सवास प्रारंभ होणार आहे.
त्यासाठी प्रशासन व मूर्ती निर्माण समितीची जय्यत तयारी करण्यासाठी पदाधिकारी व्यस्त दिसून येत आहेत. त्यांचा उत्साह उमंगत दृष्टिपथास येत आहे. लाखो भाविकांची उपस्थिती या कुंभमेळाव्यास लाभणार असल्याचा अंदाज भाविकांमध्ये चर्चीला जात आहे. कारण हा जैन कुंभमेळावा जवळ जवळ दोन महिने चालणार असून जिल्हा प्रशासनातर्फे भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच या कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था समितीच्या वतीने केली जाणार आहे. संजय पापडीवाल महामंत्री मूर्ती निर्माण समिति परमपूज्य रवींद्रकिर्तीजी स्वामीजी तसेच समितीचे पदाधिकारी महामस्तकाभिषेक महोत्सव व जैन कुंभमेळाव्याची विशेष दक्षता घेत आहेत. त्यामुळे जैन कुंभ मेळाव्या बाबत उपस्थितीमध्ये उत्साह संचारला आहे. मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथील मन मोहवुन टाकणारे शिल्पसौंदर्य मूर्तीचे सौंदर्य त्यांच्या मुद्रा व त्यांच्या मुद्रा व त्यांचे हावभाव शब्दात गुंफणे फार कठीण आहे देवळाची भव्यता समोर उभा राहिलेल्या भाविकांच्या मनात कायमचा ठसा उठल्याशिवाय राहत नाही अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्ध प्रमुख व कुसुंबा अतिशय क्षेत्राचे विश्वस्त सतीश वसंतीलाल जैन कुसुम्बा (धुळे) यांनी दिली आहे.