महापरिनिर्वाण दिनी प्रथमेश सोनवणे यांच्याकडून बाबासाहेबांना चित्रमय आदरांजली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१२/२०२१
पाचोरा येथील रंगश्री आर्ट फाऊंडेशन ड्रॉईंग अँड पेंटिंग कलासेसचा विद्यार्थी प्रथमेश दिलीप सोनवणे याने महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पेन्सिल शेडिंगच्या माध्यमातून चित्रमय आदरांजली अर्पण केली आहे.
याआधी प्रथमेश सोनवणे यांनी गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, भगवान विठ्ठल, यांच्या प्रतिकृती जलरंगात तयार केल्या आहेत. प्रथमेश हा बाळद येथील शिक्षक मा. श्री. दिलीप मंगलदास सोनवणे यांचा तो सुपूत्र असून कुंचल्यातून व पेन्सिल वापरुन तो आपल्या कलागुणांना वाव देत असतो म्हणून त्याचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी आजच्या या चित्रमय आदरांजली विषयी आपले मत कळवून शाबासकीची थाप द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
प्रथमेश सोनवणे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे.
८०८७६६९५०४