विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी करतो डराव, डराव तुम्ही कितीही करा ठराव. माझी बदली होणार नाही.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०९/२०२२
(अविनाश राठोड यांच्या बद्दल वारंवार ग्रामपंचायतीने ठराव देऊनही त्याची बदली होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. बदली न होण्यामागील कारण म्हणजे पाचोरा विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयातील एक राठोड नावाचे वरीष्ठ अधिकारी याची पाठराखण करत असल्याची चर्चा सुरू असून काही अधिकारी या कर्मचाऱ्यांला पाठीशी घालत असल्याने तुम्ही कितीही ठराव करा तरीही माझी बदली होणार नाही अश्या भुमिकेत वावरत असल्याने ‘विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी करतो डराव, डराव तुम्ही कितीही करा ठराव. माझी बदली होणार नाही’ असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही हे मात्र निश्चित.
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे, वडगाव खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक, वडगाव जोगे व कोकडी तांडा या पाच गावांसाठी मागील पाच वर्षापासून विद्युत वितरण कंपनीकडून वायरमन (तारतंत्री) अविनाश साईदास राठोड याची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु अविनाश राठोडची नियुक्ती झाल्यापासून हा कर्मचारी नियमितपणे मुख्यालयाचे जागी येत नसून पहूर येथे रहात असुन येथूनच भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विद्युत सहाय्यक किंवा ज्यांचा विद्युत वितरण कंपनीशी काडीचाही संबंध नाही अश्या मुलांकडून कामकाज करुन घेत असल्याने विद्युत ग्राहकांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे विद्युत वितरण कंपनीचा सक्षम कर्मचारी मुख्यालयात रहात नसल्याने विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
ही अडचण लक्षात घेऊन तसेच विद्युत ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन अविनाश राठोडची बदली व्हावी म्हणून वडगाव आंबे ग्रामपंचायतीने मागील दोन वर्षांपासून वारंवार अर्जफाटे व ग्रामपंचायतीचे ग्रामसभेत झालेले ठराव कनिष्ठ अभियंता वरखेडी, कार्यकारी अभियंता पाचोरा व वरिष्ठांच्या कार्यालयात पाठवल्यावर सुध्दा या अविनाश राठोडची बदली होत नसल्याने वरील पाचही गावातील विद्युत ग्राहक हैराण झाले आहेत.
याच अविनाश राठोडच्या मनमानीला वैतागून वडगाव आंबे खुर्द ग्रामपंचायतीने दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ या रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या आलेल्या तक्रारीवरून ग्रामपंचायत कार्यालयात मा. सरपंच श्री. वसंत भिवसिंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या ग्रामसभेत मौजे वडगाव आंबे येथील तारतंत्री (वायरमन) श्री. अविनाश साईदास राठोड यांची बदली होणे बाबत. त्यांच्या जागी नवीन तारतंत्री (वायरमन) ची नेमणूक होणे बाबतचा ठराव क्र.२ आज दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसभा मा. सरपंच श्री. वसंत मिसिंग पवार याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या ग्रामसभेत समेत मौजे वडगाव आंबे बुदू येथील तारतंत्री (वायरमन) श्री अविनाश साईदास राठोड यांची बदली होऊन त्यांच्या जागी नवीन चांगला वीज तारतंत्री (वायरमन) ची नेमणूक करण्यात गावी श्री. अविनाश साईदास राठौड़ हे आमच्या गावात चार ते पाच वर्षापासून कार्यरत आहेत. सदर तारतंत्री (वायरमन) च्या बाबतीत लकारीचा पाढा ग्रामस्थांनी वाचला अनेक प्रकारच्या तक्रारी ग्रामसभेत सांगण्यात आल्या सदर तारतंत्री (वायरमन) गैरहजर राहतात तारतंत्री (वायरमन) वेळेवर हजर राहत नाही लाईन फाल्ट झाल्यावर वेळेवर दुरुस्त करत नाही. गावात दोन दोन ते तीन तीन दिवस गावात लाईट राहत नाही ज्यामुळे गावात पाणी असून पाणी टंचाई सामोरे जावे लागते गावात लाईट नसल्यामुळे त्यांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लाईट ची अत्यावश्यक गरज भासते. सदर तारतंत्री (वायरमन) व्यवस्थित काम करत नाही. गावातील लोकांचे फोन उचलत नाही, फोन बंद असतो नागरिकांचा संपर्क होत नाही त्यामुळे लोक फारच कंटाळले असून सदर वायरमन ची त्वरित बदली करण्यात यावी नवीन तारतंत्री (वायरमन) नेमणूक करावी अशी
श्री. अरुण बाबुराव पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली या सुनेला श्री. मेहराम दल्लू राठोड यांनी अनुमोदन दिले व सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.
तसेच मा.कार्यकारी अभियंता साॊ. रचना तथा संचालन व व्यवस्थापन विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. पाचोरा. ता. पाचोरा. जि. जळगांव यांच्याकडे मौजे वडगाव आंबे बुद्रुक येथील तारतंत्री (वायरमन) श्री. अविनाश साईदास राठोड यांची बदली होणे बाबत यांच्या जागी नवीन तारतंत्री (वायरमन) ची बदली होणे बाबत तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जाव्दारे (मौजे वडगाव आंबे येथील वायरमन श्री. अविनाश साईदास राठोड यांची बदली होऊन त्यांच्या जागी नवीन चांगला तारतंत्री (वायरमन) ची नेमणूक करण्यात यावी कारण श्री. अविनाश साईदास राठोड हे आमच्या गावात चार ते पाच वर्षापासून कार्यरत असून सदर वायरमनच्या बाबतीत वारंवार तक्रारीचा पाढा ग्रामस्थांनी वाचला अनेक प्रकारच्या तक्रारी ग्रामसभेत सांगण्यात आल्या सदर तारतंत्री (वायरमन) गैरहजर राहतात तारतंत्री (वायरमन) वेळेवर हजर राहत नाही लाईन फाल्ट झाल्यावर वेळेवर दुरुस्त करत नाही. गावात दोन दोन ते तीन तीन दिवस गावात लाईट राहत नाही त्यामुळे गावात पाणी असून पाणी टंचाई सामोरे जावे लागते गावात लाइट नसल्यामुळे चौन्यांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लाईट ची अत्यावश्यक गरज भासते. सदर तारतंत्री (वायरमन) व्यवस्थित काम करत नाही. गावातील लोकांचे फोन उचलत नाही फोन बंद असतो नागरिकांचा संपर्क होत नाही त्यामुळे लोक फारच कंटाळले असून सदर तारतंत्री (वायरमन) ची त्वरित बदली करण्यात यावा नवीन तारतंत्री (वायरमन) नेमणूक करावी. सोबत ग्रामसभा ठराव नक्कल जोडण्यात आली असून आमच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बदली करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
(झिरो वायरमनवर कारवाईची मागणी)