पितांबर सपकाळे यांनी लांडोराला दिले जीवदान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०७/२०२३
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव शिवारात एका लांडोर पक्षाला पितांबर सपकाळे यांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून जीवदान दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील पितांबर सपकाळे हे अनिल पाटील (वाघ) यांच्या शेतात कामासाठी गेले होते. शेतात काम करत असतांनाच एक लांडोर काही कुत्र्यांच्या तावडीत सापडला असल्याचे दिसून आले. हे लक्षात येताच पिंतांबर सपकाळे यांनी लगेचच हातात काठी घेऊन धावत जाऊन कुत्र्यांना हाकलून लावत लांडोराला त्यांच्या तावडीतून सुटका करून दिलीप जैन यांना घडलेली घटना सांगितली त्यांनी त्वरित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून त्यांना अंबे वडगाव येथे बोलावून घेतले.
पाचोरा वनविभागाचे प्रकाश देवरे. (वनपाल नांंद्रा) व प्रकाश सुर्यवंशी (वनरक्षक) यांनी लगेचच अंबे वडगाव येथे येऊन जखमी लांडोर ताब्यात घेऊन शेंदुर्णी येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून उपचार करुन घेत जखमी लांडोराला मालखेडा राखीव जंगलात सोडून दिले. पिंतांबर कोळी याच्या प्रसंग सावधानतेमुळे व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परता मुळे लांडोराला जीवदान मिळाले आहे.