कॉंग्रेस आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पाचोरा शहरातील गरजूंना घरपोच रेशनकार्ड वाटप, नागरिकांनी पदाधिकाऱ्यांचा केला सन्मान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०७/२०२२
सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यातील तसेच शहरातील बऱ्याचशा कुटुंबातील सदस्यांकडे शासन मान्य रेशनकार्ड (शिधा पत्रिका) उपलब्ध नसल्याने त्यांना शासनातर्फे वाटप करण्यात येणारे शासकीय दरातील तसेच मोफतचे ध्यान मिळत नसल्याने गोरगरीब, शेतमजूर कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता तसेच बरेचसे गरजू लोक रेशनकार्ड मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु त्यांना रेशनकार्ड व बारा अंकी बारकोड मिळत नसल्याने त्यांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत होते. तसेच हालाखीची परिस्थिती असल्याने उपासमारीची वेळ आली होती.
ही समस्या लक्षात येताच गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सतत लढणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. सचिन सोमवंशी व पदाधिकाऱ्यांनी ‘कॉंग्रेस आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्याचे ठरवून त्यांनी पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागातील कुर्बान नगर, रसुल नगर, मुल्ला वाडा, अक्सा नगर, पिंजारी वाडा व इतर परिसरात जाऊन ज्यांच्याकडे रेशनकार्ड मिळवण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आहेत परंतु पाचोरा येथील पुरवठा विभागात वारंवार कागदपत्रांची पूर्तता करुन सुध्दा मागील एक वर्षापासून शिधा पत्रिका मिळत नसल्याने तसेच काही खाजगी एजंटांनी शिधापत्रिका मिळवून देण्यासाठी पैसे घेऊन फसगत झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
म्हणून शिधा पत्रिका मिळत नसल्याने राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. सचिन सोमवंशी, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष इरफान मनियार, शहर उपाध्यक्ष एडवोकेट वसिम बागवान, शहर ओबीसी सेलचे अध्यक्ष शरीफ शेख, एस.टी. सेलचे रवी सुरवाडे यांनी हतबल झालेल्या गरजूंना भेटून त्यांच्याकडून शिधा पत्रिका मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे घेऊन महसूल विभागातील पुरवठा विभागात देऊन त्यांच्या वतीने नवीन रेशनकार्ड बनवून थेट लाभार्थ्यांच्या घरापर्यंत नेऊन दिल्याने लाभार्थ्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी संदल शहा, जलील शहा, मुजाहीद शेख, अमिन शेख, शेख इब्रानखान, युनुस खान, इरफान पठाण, सादीक शेख, साबिर शेख तसेच बहूसंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
(राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांची ग्वाही.)
आजपासून राष्ट्रीय काँग्रेसतर्फे ‘कॉंग्रेस आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमात पाचोरा शहरातील तसेच तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही थेट नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कटीबद्ध आहोत म्हणून ज्यांना, ज्यांना काही अडीअडचणी असतील त्यांनी त्या सोडवण्यासाठी आमच्याकडे संपर्क करावा असे आवाहन केले आहे.