कुऱ्हाड येथे जुगार अड्ड्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई, ग्रामस्थांनी मानले आभार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१०/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड गावत सट्टा, पत्ता, जुगार, अवैधधंदे राजरोसपणे सुरु होते. जणूकाही कुऱ्हाड हे गाव अवैधधंद्याचे माहेरघर बनले होते. याबाबत काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी अवैध धंदे बंद होण्यासाठीचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षक माननीय श्री. प्रवीणजी मुंडे साहेब यांच्याकडे दिले व अधिक माहितीसाठी वरिष्ठांना पाठवले होते.
कदाचित याची दखल घेत वरिष्ठांच्या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी आज आत्ता थोड्या वेळापूर्वी आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या काही लोकांना ताब्यात घेतले असून काही दुचाकी व रोकड जप्त केली असल्याचे खात्रीलायक समजते.
या धाडसत्रामुळे कुऱ्हाड गावात आम्ही पोलिसांना हप्ते देतो आमची वरपर्यंत ओळख आहे. अशी शेखी मिरवणाऱ्यांची दातखीळ बसली असून या अवैधधंद्याची पाठराखण करणारे लोहारा दुरक्षेत्रचे पोलिस हेड कॉन्स्टेबल कुलकर्णी यांना अवैधधंदे करणारांनी शिव्यांची लाखोली वाहिल्याची चित्रफीत काही सजग नागरिकांनी तयार केली असल्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात होत आहे.
मात्र या कारवाईचे सर्वसामान्य नागरिक, सुज्ञ नागरिक व महिलावर्गाने स्वागत केले असून पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच पिंपळगाव पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली न येता आमच्या गावातील सर्व प्रकारचे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करावे अशी विनंती केली आहे.
कारण कुऱ्हाड येथील अवैधधंदे हे आसपासच्या दहा खेड्यांची डोकेदुखी ठरत असून या अवैधधंद्यामुळे बरीचशी कुटुंब बर्बाद झाली असून बरीचशी कुटुंबे व तरुणपिढी बर्बादिच्या मार्गावर आहेत. यातुनच मागे आत्महत्या, भांडणे झाली आहेत.