सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›कुऱ्हाड खुर्द गावात आज होणार नवीन जुगाराच्या अड्ड्याचा शुभारंभ. अवैधधंदे बंद करा नाहीतर आमच्यावर गुन्हे दाखल करा कुऱ्हाड गावातील महिलांची मागणी.

कुऱ्हाड खुर्द गावात आज होणार नवीन जुगाराच्या अड्ड्याचा शुभारंभ. अवैधधंदे बंद करा नाहीतर आमच्यावर गुन्हे दाखल करा कुऱ्हाड गावातील महिलांची मागणी.

By Satyajeet News
December 6, 2021
915
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१२/२०२१

(दारुबंदी करण्यासाठी सतत झटत असणाऱ्या आदरणीय गीतांजली ताई ह्या येत्या ०९ डिसेंबर गुरुवारी कुऱ्हाड गावी भेट देणार असून पिंपळगाव हरेश्वर पोलिस व जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेणार आहेत.)

पाचोरा तालुक्यातच नव्हे तर चाळीसगाव, सोयगाव व जळगाव जिल्ह्यात अवैधधंद्याचे माहेर घर म्हणून प्रसिध्दीस येत असलेल्या कुऱ्हाड गावात आज एका नवीन जुगाराच्या अड्ड्याचा शुभारंभ मोठ्या थाटात होणार असून हा अड्डा चालवण्यासाठी संबधित चालकाला कायद्याच्या रक्षकांपैकी एकाने हम करे सो कायदा असा स्वताचा गैरसमज करुन अनाधिकृतरीत्या परवानगी दिली असल्याचे जनमानसातून चर्चिले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असेकी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड हे गाव सट्टा, पत्ता, गावठी दारू, देशी दारू विक्री या अवैध धंद्यांचे माहेरघर बनले आहे. याबाबत गावातील सुज्ञ नागरिकांनी व महिला वर्गाने वारंवार तक्रारी करून सुद्धा हे अवैध धंदे थांबण्याचे नाव घेत नसून उलट दिवसेंदिवस अवैध धंदे करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

या अवैधंद्यामुळे आजपर्यंत बरेचसे वादविवाद झाले असून आत्महत्या सारखे प्रकार घडले आहेत. तसेच या ठिकाणी आसपासच्या आठ ते दहा गावातील जुगारी, सट्टा, पत्ता खेळणारे येत असल्याने कुऱ्हाड गावात जणू बाजारच भरतो तरीही हे अवैधधंदे बंद होत नाहीत कारण या अवैधधंदे करणारांना राजकीय पाठबळ मिळत असावे अशी शंका उपस्थित केली जात असून हे अवैधधंदे बंद होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढत असल्याने कुऱ्हाड गावासह पंचक्रोशीतील गावात चिंता व्यक्त केली जात आहे.

कुऱ्हाड गावातील गावठी दारू निर्मिती व विक्री दिवसाढवळ्या अहोरात्र २४ तास सुरू असून येथील गावठी दारू निर्मिती व विक्री आसपासच्या दहा खेड्यांची डोकेदुखी ठरत आहे. तसेच गावात ठिकठिकाणी खुलेआमपणे सट्टा बेटिंगची दुकाने दिसून येतात. या गावात अगोदर एक जुगाराचा अड्ड्या दिवसाढवळ्या रात्रंदिवस सुरु असून दुसरा चोरी,चोरी, चुपके, चुपके सुरु आहे.

आज रोजी कुऱ्हाड गावात नवीन जुगाराचा अड्डा सुरु होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या अड्ड्याचा शुभारंभ मोठ्या थाटात होणार असल्याचे बोलले जाते. यामागील कारण म्हणजे संबंधित जुगाराचा अड्ड्या सुरु करण्यासाठी मला परवानगी मिळाली असून दरमहा १५०००/०० हप्ता ठरला असल्याचे संबंधित व्यक्ती मोठ्या रुबाबदार शैलीत सांगत असल्याचे जनतेतून चर्चिले जात आहे.

हे गाव अवैधधंद्याचे माहेर घर बनलेले असून याबाबत कुणीही आवाज उठवल्यावर त्या व्यक्तीला हे अवैधधंदे करणारे दमदाटी करत असल्याने मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला कुणीही तयार होत नसल्याने अवैधधंदे करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून या अवैधंद्यामुळे लहान, थोर,तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी जात असल्याने अनेक कुटुंब बर्बाद झाली असून बरीचशी कुटुंब बर्बादीच्या मार्गावर आहेत.

या अवैधधंद्याचे विरोधात वारंवार आवाज उठवल्यावरही कोणतीही ठोस कारवाई होऊन हे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद होत नसल्याने सुज्ञ नागरिक व सर्वसामान्य जनता विशेष करुन महिलावर्ग हताश होऊन आपल्या नशीबाला दोष देत हे नशीबातील भोग समजून हतबल होऊन जीवन जगात असल्याचे दिसून येते.

(त्यांना आम्ही पाहून घेऊ = कुऱ्हाड खुर्द गावातील अवैधधंद्याचे विरोधात आवाज उठवणाऱ्यांना वेगळाच अनुभव येत असून अधूनमधून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे दमदाटी होत असल्याचे समजते तसेच अश्या कितीही बातम्या छापून आल्यातरी आमचे काहीही वाकडे होणार नाही. वेळ आल्यावर पत्रकार व वार्ताहरांनाही पाहून घेऊ अशी भाषा वापरली जात असल्याने लवकरच काही नागरिक नाशिक येथे जाऊन आय.जी.साहेबांची भेट घेऊन कैफियत मांडणार असल्याचे बाजूला बोलले जात आहे. )

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 75
Previous Article

पाचोऱ्यात शिवसेनेला पुन्हा धक्का, बालेकिल्ल्यातच भाजपाचा सुरुंगअमोल ...

Next Article

महापरिनिर्वाण दिनी प्रथमेश सोनवणे यांच्याकडून बाबासाहेबांना चित्रमय ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    कुऱ्हाड शिवारात चोरांनी दिला शेतकऱ्याला झटका, बारा हजार रुपयांहून अधिक नुकसान.

    December 13, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    बनावट कागदपत्रे बनवून महानुभाव आश्रम, मंदिर व मालमत्ता हडप करण्याच्या कटातील पाचही संशयित आरोपींना पोलीसांनी घेतले ताब्यात.पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांची ...

    August 20, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    जावयाने दिली मावस सासऱ्याला जीवे मारण्याची धमकी.

    December 24, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सोयगाव तालुक्यातील विरप्पनचा पाचोरा तालुक्यात धुमाकूळ, दररोज होतेय शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल.

    January 29, 2025
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    मयत आयुषच्या काकानेच दिली कबूली, संशयित काकाला अटक खूनाचे कलम वाढवले.

    December 16, 2020
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    स्वस्त धान्य दुकानातून होणारा काळाबाजार न थांबल्यास तीव्र आंदोलन, श्रीमती साधनाताई काळे यांचा इशारा.

    December 7, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधींच्या चौकशी विरोधात पाचोरा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन.

  • Uncategorized

    कुऱ्हाड खुर्द येथील अनिल चौधरी यांचे अपघती निधन.

  • विविध यश निवड

    पिंपळगाव मंडळात अक्षय मंदाडे यांची भाजप युवा मोर्चा सरचिटणीसपदी नियुक्ती.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज