नाशिकमध्ये भरदिवसा थरार, तरुणावर प्राणघातक हल्ला
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कैलास प्रल्हाद पिसे (वय ४५) व सपिता प्रल्हाद पिसे (वय ४०, रा. आसराची वेस, खैरेगल्ली, जुने नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. किरण भरत पाटील (रा. मोदकेश्वर मंदिराजवळ, जुने नाशिक) याने तक्रार दिली आहे. जुन्या वादातून संशयितांनी दुपारी पाटील यास शिवीगाळ करत धारदार चाकूने त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे तो जखमी झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.
वालदेवी नदीत तरुणाचा मृत्यू
आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. २५) सकाळी संगम परिसरात हा प्रकार घडला. विशाल गोरख जाधव (वय २२, रा. गिते मळा, नाशिकरोड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जाधव हा शुक्रवारी सकाळी आंघोळीसाठी दारणा-वालदेवी नदी संगम परिसरात गेला होता. या ठिकाणी तो पाण्यात बुडाला. संगम परिसरात त्याचा मृतदेह नदीच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. नाशिकरोड पोलिसांनी नोंद घेतली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.