तमाशात गोंधळ घालणार्यांची आठ वर्षानंतर निर्दोष मुक्तता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे सालाबादा प्रमाणे डिसेंबर महिन्यात हिंदु- मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या गैबानशः बाबा यांचा यात्रा (उरुस) भरतो त्यामुळे प्रामुख्याने पंचक्रोशीतील सर्व धर्मियलोक यावेळी प्रमुख्याने हजेरी देतात. म्हणून या उरुस यात्रेत महाराष्ट्राचे पारंपारिक कला जोपासणारे तमाशाचे देखील आयोजन करण्यात येते. सन २०१२ मध्ये देखील शिंदाड येथे गैबानशा बाबा यांच्या उरूस निमित्त तमाशाचे आयोजन करण्यात आले होते.
परंतु तमाशा चालु असतांना अचानक विद्यूत पुरवठा खंडित होऊन अंधार झाला होता. यामुळे एकच गोंधळ उडाला यात तमाशा कलावंत स्त्री-पुरुषांना मारहाण केल्याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला प्यारेलाल वाघ यांच्या तक्रारीवरून गुरनं ६६/२०१४ हा नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणी शिंदाड येथील सुमारे १६ लोकांना आरोपी करण्यात आले होते. सदर गुन्हयाचे कामाकाज नुकतेच पाचोरा येथील न्यायालयात मे.न्यायमूर्ती सिद्दीकी साहेबांच्या समोर चौकशीला होते. यात फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी व घटनेतील पाच साक्षीदार तपासण्यात आले यात महिला कलावंत यांचे जाबजबाब व चौकशीअंती कोणताही पुरावा आढळून न आल्यामुळे सदर प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आरोपी तर्फे क्रमांक एक यांच्यातर्फे अँड.अभय पाटील व आरोपी २ ते १६ तर्फे अँड.दिपक पाटील तर सहकार पक्षातर्फे अँड. माने यांनी काम पाहीले
आठ वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकारामुळे महाराष्ट्रात चांगलेच चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे अनेकांचे लक्ष या निकालाकडे लागुन होते तर आजच्या मे. कोर्टाच्या निकालाने यात अडकलेल्या मात्र नोकरी साठी पात्र असलेल्या अनेक युवकांना दिलासा मिळालेला आहे.