सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची वरसाडे तांड्यावर सांत्वन भेट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०४/२०२३
पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथील आंबादास भिका राठोड वय वर्षे (२७) हा सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा येथे बहिणीला भेटायला जात असतांना शिरसाळा गावाजवळ एका झाडाखाली थांबला असता त्याच्यावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक ०६ एप्रिल २०२३ गुरुवार रोजी घडली होती. तसेच आज दिनांक १० एप्रिल २०२३ सोमवार रोजी दुपारी वरसाडे येथील प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण याचा शेतात काम करतांना उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
या घटनेची माहिती मिळताच पाचोरा येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी व माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. उध्दव भाऊ मराठे यांनी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणी साठी ठरलेल्या कार्यक्रमाला स्थगित करुन त्वरित वरसाडे तांडा येथे जाऊन मयत आंबादास राठोड व प्रेमसिंग चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.