गरुड महाविद्यालयात रासेयो एकका द्वारे माझी वसुंधरा शपथ उत्साहात.

दिलीप जैन.(शेंदूर्णी)
दिनांक~११/१०/२०२१
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथेल अ.र.भा.गरुड कला,वाणिज्य आणी विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांंगणात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संजय भोळे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्षतेखाली दिनांक ११ ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता अ.र.भा.गरुड कला वाणिज्य महाविद्यालय तर्फे वरिष्ठ व १०+२ रासेयो एककाद्वारे माझी वसुंधरा शपथेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून ह्या मातीचे ऋण प्रत्येकाने फेडले पाहिजे असे प्रतिपादन प्रा.संजय भोळे यांनी मार्गदर्शन करतांना केले. तसेच रासेयो एककाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमात प्रा.दिनेश पाटील यांनी माझी वसुंधरा ही शपथ विद्यार्थ्यांना दिली. पर्यावरण संवर्धनासाठी फळे देणारी ५० झाडे लावण्यासाठी ५० खड्डे खोदून या खड्ड्यात रोपट्यांची लागवड करण्यासाठीची पूर्व तयारी करुन ठेवली आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक १०+२ रासेयो विभागाच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.वर्षा लोखंडे यांनी तर आभारप्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा.दिपक पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.श्याम साळुंखे,उपप्राचार्य प्रा.निरुपमा वानखेडे,डॉ.प्रशांत देशमुख,प्रा.प्रमोद सोनवणे, प्रा.आप्पा महाजन, डॉ.महेश पाटील,प्रा.सपकाळे सर,प्रा.अमर जावळे,प्रा.सुजाता सी.पाटील, डॉ.भूषण पाटील,डॉ.आर.डी.गवारे, डॉ.ए.एन.जिवरग, डॉ.वसंत एन.पतंगे, प्रा.निलेश बारी,प्रा.निलेश चौधरी,प्रा.वर्षा पवार, प्रा. प्रतीक्षा गरुड,प्रा.छाया पाटील, प्रा.रीना पाटील,प्रा.संदीप कुंभार व इतर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.