सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची यशस्वी सात वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात पाचोरा तालुक्यात विविध उपक्रम.

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची यशस्वी सात वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात पाचोरा तालुक्यात विविध उपक्रम.

By Satyajeet News
May 30, 2021
91
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०५/२०२१

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची यशस्वी सात वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने भाजपाचे सेवा हेच संघटन हे ब्रीद जोपासत तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात पाचोरा तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात आले.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची यशस्वी सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुक्याच्या वतीने सेवा हेच संघटन हे ब्रीद जोपासत भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. यावेळी संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना काळात फ्रन्ट-लाइन वर्कर म्हणून काम करणारे सर्व शासकीय डॉक्टर्स, नर्सेस,कंपाउंडर,रुग्णवाहिका चालक, परीचालक गावातील आशा सेविका,तसेच शासकीय रूग्णालयातील साफ-सफाई करणारे कर्मचारी या सर्वांना गावा-गावात जाऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी नगरदेवळा व लोहटार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह परिसरातील गावात भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व मा.सभापती सुभाष पाटील यांनी पाचोरा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना व आशा सेविकांना सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.तसेच यावेळी लसीकरणासाठी उपस्थित नागरिकांना चहा व बिस्कीट वाटप करण्यात आले.

तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी देखील पिंपळगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील व परिसरातील गावांमध्ये जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना व आशा सेविकांना सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

मा.सभापती बन्सीलाल पाटील यांनी देखील नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रासह परिसरातील गावा-गावांत जाऊन आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

यासोबतच भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी यांनी पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालय व पंचमुखी हनुमान चौकातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसह शहरातील आशा सेविकांना सन्मानित केले.व लसीकरणासाठी उपस्थित असणाऱ्या नागरिकांना चहा आणि बिस्कीट चे वाटप केले.यासह संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावातील आशा सेविकांना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गावा-गावांत जाऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले की तालुक्यातील सर्व डॉक्टर नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका हे कोरोना काळात जे काम करत आहेत. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कोरोनाच्या या भयावह परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना देखील रुग्णाजवळ जाता येत नाही.परंतु सर्व आरोग्य कर्मचारी हे आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत असतात. व आपल्या परीवारा पासुन दुर राहून ते इतरांच्या परिवाराची काळजी घेतली आहेत.त्यामुळे त्यांचे ऋण फेडणे तर शक्यच नाही.परंतु एक सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करून त्यांचे सर्वांचे आभार मानतो. असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, या प्रसंगी याप्रसंगी भाजपा तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ तालुका उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी, नगरदेवळा येथील सरपंच प्रतिक्षा काटकर, उपसरपंच विलास भामरे,पिंपळगाव येथील डॉ.शांतीलाल तेली,भाजपा नगरदेवळा शहराध्यक्ष नामदेव पाटील,भाजपा पिंपळगाव शहराध्यक्ष विनोद पाटील,दिपक माने,राजेश संचेती,रमेश शामनानी,परेश पाटील,भैया ठाकूर, विरेंद्र चौधरी,जगदीश पाटील,गजानन पाटील,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 28
Previous Article

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक ...

Next Article

पाचोरा भडगाव तालुक्यातील नवीन रस्ते कामासाठी ५ ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर येथे २२ मार्च ते २४ मार्च पर्यंत कडकडीत बंद. मात्र देशी दारुचे दुकान सुरु असल्याने सुज्ञ नागरिक व ...

    March 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    प्रा.डी.एम.ललवाणी यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर.

    September 4, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा ग्रामीण रुग्नालय अँम्बुलन्स असोशियशन चा वतीने नवनियुक्त पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचा सत्कार

    November 8, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    प.पू.प.म.आचार्य प्रवर श्रीयेळमकर नवे बाबाजी यांच्या महंती वर्षपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..

    March 17, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    भोई समाज संघर्ष सेनेची स्थापन व शाखा उदघाटन एकच दिवशी.

    January 27, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तळोदा शहराध्यक्षपदी योगेश मराठे.

    August 17, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedआपलं जळगाव

    अंबे वडगाव येथील रामराव पाटील.( शळके) यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन.

  • क्राईम जगत

    इलेक्ट्रिक पोल व विद्युत वाहिनीच्या तारांचे नुकसान करणाऱ्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल मात्र ट्रक चालक ट्रक घेऊन फरार.

  • क्राईम जगत

    बनून आला पाहुणा आणी पाच लाखाचा लावला चुना. पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील घटना.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज