दिनांक~०६/०२/२०२३

*वधू-वर परिचय मेळावे ही काळाची गरज!*
*म्हणून जामनेर येथे होऊ घातलेल्या परिचय मेळाव्यात सामील व्हा*
संतोष पाटील
——————————————————————–
दिनांक 25 फेब्रुवारी 20 23 रोजी जामनेर येथील विशाल लॉन्स या ठिकाणी सकल मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी समस्त समाज बांधवांनी आपल्या उपवर मुला मुलींचे परिचय पत्र घेऊन हजर राहावे (किंवा जे समाज बांधव आपल्या गावामध्ये येऊन तो फार्म भरून घेत आहेत तो फार्म भरून घ्यावा जेणेकरून आपल्या मुला मुलींचे परिचय पुस्तकांमध्ये छापता येईल) अशी कळकळीची विनंती सकल मराठा समाजाकडून करण्यात आलेली आहे
——————————————————————-
समाज बांधवांनो अशा मेळाव्याची गरज फार नितांत झालेली आहे. कारण आपण आपल्या नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर शहरांमध्ये किंवा आपल्या कामामध्ये फार व्यस्त असतो, त्याच्यामुळे आपल्या समाजातील नात्या गोत्या मध्ये कुणाच्या मुलीचे मुलाचे लग्न करायचा आहे हे आपल्याला माहीत नसतं, पूर्वीच्या काळी समाजामध्ये काही लग्न जोडणारी सदग्रस्त असत ती प्रामाणिकपणे आपलं काम करून दोनाचे चार हात करण्यासाठी प्रयत्न करत असत मात्र आता कुणाजवळ वेळ नाही. त्याला आपलं घर चालवणं अवघड झाले आहे त्याच्यामध्ये मनामध्ये असलेली स्वार्थी भावना हेही कारण झालेल आहे मात्र आपण समाजाचं देणं लागतो हे आपण पूर्णपणे विसरून गेलो असताना, जामनेर व जामनेर परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन फार मोठं मोलाचं काम करत आहेत, गावोगावी स्वखर्चाने फिरून कडाक्याच्या थंडीमध्ये छोट्या छोट्या कॉर्नर्स सभा घेऊन समाजाला एकत्रित करून मेळाव्या साठी आमंत्रण देत आहेत, यासाठी काम करणाऱ्या सर्व समाजसेवकांच ऋण शब्दात व्यक्त करता येणार नाही मित्रहो एक प्रचंड वारसा लाभलेला मराठा समाज या समाजाची होणारी वाताहत पाहून फार वाईट वाटतं, तिथल्या गरीब पोरांची लग्न होत नाहीत या पोरांच्या लग्नासाठी काही करता येईल का? म्हणून झटणारे ही मेळाव्याचे आयोजन करणारी मंडळी फार मोलाचे काम करत आहे, या ठिकाणी कुठल्याही कार्यकर्त्याला कुठलीच अपेक्षा नाही फक्त आपले दुर्लक्षित राहिलेले भावंड एकत्र करून त्यांच्या मुला-मुलींची लग्न व्हावे इतकीच माफक अपेक्षा मनामध्ये ठेवून हे कार्यकर्ते काम करत आहेत, यामध्ये कुठलेच राजकारण नाही समाजातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते एकत्रितपणे सभा घेऊन एका मंचावर बसून समाज हित जोपासण्यासाठी एकत्र येत आहेत ,आपण सर्वांनी या कार्याला हातभार देण्यासाठी उपस्थित राहायचे आहे याठिकाणी *राजकारणाचे बूट बाहेर काढून* समाजकार्याच्या हॉलमध्ये एकत्र येऊन सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवायची आहे त्यासाठी आपण सर्वांनी येण्याचे अगत्य करावे ही नम्र विनंती
*आयोजक सकल मराठा समाज जामनेर*

संतोष पाटील
7666447112