पिंपळगाव हरेश्र्वर येथे स्व.ग.भा.लिलाबाई पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मोफत रोग निदान शिबीर संपन्न.
दिपक मुलमुले.(पिंपळगाव हरेश्र्वर)
दिनांक~०५/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथील स्व.ग.भा.लिलाबाई वसंतराव पाटील यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचालक डॉ.मा.श्री. स्वप्नील प्रल्हादराव पाटील (एम.बी.बी.एस.एम.डी.) गोल्ड मेडलीस्ट व डॉ. ग्रीष्मा पाटील एम.बी.बी.एस.(डी.सी.एच.) बालरोगतज्ज्ञ यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.
या शिबिरात डॉ. स्वप्नील पाटील व डॉ. ग्रीष्मा पाटील यांनी आलेल्या गरजु रुग्णांची तपासणी करुन मधुमेह, हृदयरोग, मिरगी, यकृत विकार, उच्चरक्तदाब थायरॉईड, दमा, संधिवात, किडनी विकार, फुफ्फुस श्वसन, मेंदू विकार, लखवा, क्षमता चाचणी, इत्यादी आजारांवर उपचार करण्यात आले व बालरोग विभाग मार्फत ताप, खोकला, सर्दी, व्हायरल फिवर, पांढऱ्या पेशी वाढणे, कमी होणे, तांबड्या पेशी वाढणे, कमी होणे, टायफाईड, डेंग्यू, मलेरिया, कावीळ, फिट येणे, डोकेदुखी, डायरिया, रक्तविकार, ऍनिमिया, थॅलासिमीया, निमोनिया, रक्तातील साखर तपासणी, (इ.सी.जी.), कार्डीओग्राम, ब्लडप्रेशर, रक्त तपासणी तसेच लहान मुलांच्या सर्व आजारांची मोफत तपासणी व मोफत उपचार करण्यात आले.
या मोफत रोगनिदान शिबिराचे वेळी ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष देविदास महाजन, माजी जिल्हापरिषद सदस्य उद्धव भाऊ मराठे, राजुभाऊ महाजन, भाजपाचे परेश पाटील, पी. एस. पाटील, शेख सर, रविंद्र गिते, अतुल पाटील, प्रशांत नैनाव, अंतिम महाजन, चेतन पवार, अजय नैनाव, मनोज बडगुजर, पी. ओ. चौधरी, उल्हास पाटील, कल्पेश जैन, धीरज जैन, विष्णू गिते यांची उपस्थिती होती. ्
या शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. मधुबाला मालकर, डॉ.शांतीलालजी तेली, डॉ. सुनील माळी, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. संदिप मालकर, डॉ. प्रदीप नैनाव, यांनी विशेष परिश्रम घेतले.