सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

Uncategorizedराजकीय
Home›कृषी विषयक›Uncategorized›पाचोरा,भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पांनी केले जिल्हाचे नेतृत्व.

पाचोरा,भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पांनी केले जिल्हाचे नेतृत्व.

By Satyajeet News
September 27, 2021
257
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(जळगाव)
दिनांक~२७/०९/२०२१

जळगाव जिल्ह्यात पंचायत राज समीतीचा दौरा आहे. दरम्यान लोकांच्या तक्रारी येतच आहेत. परंतु आतापर्यंत घेतलेल्या तक्रारीवर कोणतीच कारवाई झाली नसल्याने आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही.

तरीही आपले आमदार मा.किशोर आप्पा पाटील त्या समीतीत असल्या कारणाने थोडा विश्वास वाढला असून जळगाव जिल्हा जागृत जनमंचने आपल्या तक्रारी आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून मांडल्या आहेत.

सोमवारी सकाळी १०-३० ते ११-३० वाजेच्या दरम्यान आमदार महोदयांनी जळगाव येथील मोरोक्को हॉटेलमध्ये जिल्हा जागृत जनमंचची बैठक घेतली. कारण की आमदार किशोर आप्पा पाटील यांना विशेष आमंत्रण देऊन बोलवण्यात आले होते. याप्रसंगी किशोर आप्पा पाटील यांची उपस्थिती झाल्यानंतर प्रथम शिवराम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. नंतर जिल्ह्यातील आलेल्या अनेक तक्रारी ऐकून व समजून घेत त्या तक्रारींचे निरसन करण्याची जबाबदारी किशोर आप्पा पाटील यांनी घेतली आहे.

धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे घरकुलासाठी जिल्हाधिकारी यांनी जमीन देऊन आठ महिने झाले आहेत. तरीही धरणगावच्या गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे यांनी लेआऊट बनवून लाभार्थ्यांना प्लॉट दिलेले नाहीत. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघातील हे प्रकरण असूनही गरीबांना घरकुल देण्यात गुलाबराव पाटील मदत करीत नाहीत. त्यामुळे गुलाबराव पाटलांच्या कार्यपद्धतीवर शंका घेतली जात आहे. म्हणून मुद्दाम शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचेकडे तक्रार करण्यात आली आहे.

जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर व कॉन्सेन्ट्रेटर खरेदी मधे साडेतीन कोटीचा अपहार उघड झाला. तेथेही पालकमंत्री जबाबदार असल्याने हे प्रकरण मुद्दाम शिवसेनेचे आमदार मा.किशोर पाटील यांचेकडे सोपवले. शिवसेनेचे आमदार मा.चिमणराव पाटील यांनी डीपीडीसी मिटींग मध्ये हरकत घेतल्याने गुलाबराव पाटील नाराज झाले असून त्यांना घरचा आहेर मिळाल्याने त्यांच्यावर संशयास्पद अंगुलीनिर्देश होत आहे.

पालकमंत्री हे डिपीडिसीचे अध्यक्ष असतात. डिपीडिसीच्या निधीतून व्हेंटिलेटर व कॉन्सेन्ट्रेटर खरेदी केले आहेत.म्हणून पालकमंत्री अडचणीत येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
पालकमंत्री हेच संशयाच्या भोवऱ्यात येत असल्याने पंचायत राज समीती त्यांचेविरोधात तक्रार घेतील का ? घेतली तर कारवाई करतील का ? याबाबत शंका आहे.

पारोळा तालुक्यातील मुंदडा येथे २०१७ मध्ये २ लाख रुपयाचा अपहार सरपंच व ग्रामसेवक यांनी केला असून तसे चौकशीतून आरोप सिद्ध झाला असल्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओने गटविकास अधिकारी यांना दिले.तरीही कारवाई झाली नाही. याचीही तक्रार आमदार किशोर पाटलांना देण्यात आली.

पाचोरा तालुक्यातील आरटीई शाळांसाठी केंद्र सरकार कडून राज्य सरकार व राज्य सरकार कडून जळगाव जिल्हा परिषदेत आलेले आहे.शिक्षणाधिकारी अडवणुक करीत आहेत. तशी तक्रार आमदार किशोर पाटील यांचेकडे देण्यात आली.

जळगाव जिल्ह्यातील जिल्हापरिषद ठप्प झालेली आहे.म्हणून जिल्हापरिषद कर्मचाऱ्यांकडून वर्गणी जमा करून पंचायत राज समीतीला खुष करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. याचीही तक्रार आमदार किशोर पाटील यांच्याकडे करण्यात आली.

जळगाव जिल्हा जागृत जनमंच तर्फे आमदार महोदयांचा सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्हाचे नेतृत्व आपण स्विकारावे अशी गळ आप्पांना घालण्यात आली.जळगाव जिल्हाचे पालकमंत्री म्हणून आमदार किशोर पाटलांची नेमणूक करावी. यासाठी आमदार महोदयांना ग्रामविकास खाते सोपवण्यात यावे.अशी मागणी जळगाव जिल्हा जागृत जनमंच करणार आहे.ग्रामविकासमंत्री मा.हसन मुश्रीफ यांचेवर इडीची कारवाई होऊ शकते.त्यांचे मंत्रीपद जाऊ शकते.म्हणून ते खाते आमदार किशोर पाटील यांचेकडे सोपवले जावे.अशी जिल्ह्यातील नागरिकांची मागणी आहे.

या बैठकीत सुरज पांडे, डॉ सुभाष राणे, ईश्वर मोरे, दिपककुमार गुप्ता, अनिल नाटेकर, अमोल कोल्हे, राकेश वाघ,प्रफुल्ल पाटील, गुरूनाथ सैंदाणे,निलकंठ पाटील ,प्रेम शामलानी व त्यांचे सहकारी हजर होते.विवेक ठाकरे यांनी आमदार महोदयांचा सत्कार करून तक्रार सोपवली.ईश्वर मोरे यांनी आभारप्रदर्शन केले.

….शिवराम पाटील.
९२७९९६३१२२
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 53
Previous Article

लोहारा येथे भुरट्या चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडले, ...

Next Article

डाॅ.बापु सोनवणे आयुष्य रत्न पुरस्काराने सन्मानित.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    वरखेडी भोकर येथे चार वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

    November 15, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    ग्रामसेवक नियमितपणे मुख्यालयात येत नसल्याने ग्रामस्थ अडचणीत.

    January 29, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    उद्या पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन.

    June 25, 2025
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कल्याण येथे स्कूल बसच्या धडकेत कुऱ्हाड येथील इसमाचा दुर्दैवी मृत्यू.

    October 7, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    आताची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे नारायण राणे पोलिसांच्या ताब्यात.

    August 24, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी त्यानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. संतोष पाटील.

    January 30, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • दिन विशेष

    फादर्स डे निमित्त निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड यांसह मान्यवरांचा सत्कार, डॉ. कलाम पुस्तक भिशीचा प्रेरणादायी सामाजिक उपक्रम.

  • क्राईम जगत

    शिंदाड गाव अवैध धंद्यांच्या विळख्यात ; कारवाई एकीकडे, धंदे दुसरीकडे, जनतेत तीव्र संताप व संभ्रम.

  • पाचोरा तालुका.

    चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी मुक मोर्चात सामील व्हा, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज