उपशिक्षणाधिकारी जळगाव यांच्या चौकशी अहवालातून बोगस शिक्षक भरतीचा खरं गौडबंगाल आलं समोर !
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०८/२०२१
गेल्या महिन्यात नगरदेवळे येथील सरदार एस के पवार माध्यमिक विद्यालयातील बोगस शिक्षक भरती संदर्भात मा. उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जि.प. जळगाव यांनी शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष चौकशी केली होती. सदर बोगस शिक्षक भरती संदर्भात नेमकं उपशिक्षणाधिकारी यांनी काय चौकशी केली आणि वरिष्ठांना काय अहवाल सादर करतात हे सगळं गुलदस्त्यात होते. परंतु तक्रारदार यांनी माहिती अधिकार कायदा २००५ चा वापर करून तो चौकशी अहवाल मिळवला आहे.
चौकशी अहवालातील सविस्तर वृत्तांत
श्रीमती के डी चव्हाण उपशिक्षणाधिकारी जि.प. जळगाव यांनी नगरदेवळे येथील सरदार एस के पवार माध्यमिक विद्यालयात १३/७/२०२१ चौकशी केली असता फक्त उर्दू शाळेतील तीन शिक्षक उपस्थित होते. तक्रारीनुसार इतर शिक्षकांबाबत चौकशी केली असता मुख्याध्यापक यांनी इतर शिक्षकांना ओळख नाही असे लेखी दिले आहे. हयाच शिक्षकांबाबत मा. शिक्षणाधिकारी ( माध्य.) जळगाव. यांनी १४/०६/२०२१ मा. श्री डी.पी. महाजन शिक्षण निरीक्षक यांना विचारणा केली असता त्यांनी लेखी खुलासा दिला आहे.
सदर लेखी खुलासा मध्ये महाजन यांनी स्पष्ट केलं आहे की, वरील १२ शिक्षकांना मी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. जळगाव या पदावर कार्यरत असतांना मान्यता दिलेली नाही.
महाजन यांनी यापूर्वी दि. ५/११/२०१९ ला शिक्षण उपसंचालक यांना पत्र पाठवून माझ्या बनावट स्वाक्षरीचा उपयोग करून शालार्थ साठी प्रकरणे दाखल होतील हया बाबत चौकशी करावी.
तस मुख्याध्यापक यांच्या यापूर्वीच्या माहिती अधिकारांतर्गत च्या पत्रानुसार एकही तुकडी विनाअनुदानित नसतांना विनाअनुदानित वरुन अनुदानित वर श्रीमती संगिता मोरे व मनिषा परदेशी हे विनाअनुदानित वरुन कोणत्या नियमानुसार अनुदानितवर शिक्षक झाले असे नमूद आहे. सदर नस्तीचे अवलोकन केले असता मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी टिपणीत भविष्यात काही तक्रार आल्यास रद्द करण्याच्या अटीवर मान्य केलं होतं !
तस याबाबत गेल्या महिन्याच्या चौकशीमध्ये मुख्याध्यापकांनी सदर शिक्षकांना ओळखत नसल्याचे सांगितले आहे.
श्रीमती चव्हाण मॅडम उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी मागील सर्व कागदपत्रांची तपासणी आणि श्री डी पी महाजन यांच्या लेखी खुलासा आणि शाळेतील मुख्याध्यापक यांच्या लेखी पत्राद्वारे सदर शिक्षकांना मी ओळखत नाही त्यांच्या जबाब !
त्यामुळे वर्ग/ तुकडी मान्यता आदेश, विना अनुदानित वैयक्तिक मान्यता आदेश, सेवा जेष्ठता यादी, भरती प्रक्रिया, रोष्टर यांची कार्यालयातून संस्थेकडून सविस्तर खात्री केली असता नियमात नसल्याचे लक्षात आले आहे. तरी आपण आपल्या स्तरावरून मान्यता रद्द करण्याबाबत कार्यवाही करावी.
कारण वरील १२ उमेदवारांच्या भरतीबाबत आपल्या कार्यालयात (रिसिट रजिस्टर) मध्ये नोंदी आढळून येत नाहीत.
वरील सविस्तर चौकशी अहवाल आपल्या सरदार एस के पवार माध्यमिक विद्यालय नगरदेवळे ता.पाचोरा येथील बोगस शिक्षक भरती संदर्भात मा. शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प. जळगाव यांच्याकडे सादर केला आहे.