पाचोरा येथे ३० जून गुरुवार रोजी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०६/२०२२
आज सकाळी भडगाव, पाचोरा तालुक्यातील तमाम शिवसैनिक, पाचोरा तालुका महिला आघाडी तसेच पाचोरा शहरातील सर्व शिवसैनिकांनी आपल्या पाचोरा, भडगाव तालुक्याचे सर्वांच्या सुखदुःखात धाऊन येणारे लोकप्रिय आमदार आप्पासाहेब मा. श्री. किशोर पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत व यापुढेही कायम पाठीशी उभे रहाण्याचा निर्धार करण्यासाठी विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात केले होते.
या बैठकीत पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांचे समर्थन करण्याचा एकमुखी निर्धार करुन पाठिंबा दर्शविण्यासाठी या पाठींब्याच्या समर्थनार्थ दिनांक ३० जून २०२२ गुरुवार रोजी पाचोरा शहरातून भव्य रॅली काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे. म्हणून पाचोरा, भडगाव तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी या भव्य रॅलीत जास्तीत, जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीत सौ. सुनीता ताई पाटील, मुकुंद बिलदीकर, किशोर बारावकर, सुमीत पाटील, चंद्रकांत धनवडे यांनी शिवसैनिकांना योग्य मार्गदर्शन करत समर्थनार्थ रॅली काढण्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर गंगाराम पाटील, शरद पाटे, जितेंद्र जैन, विजय राठोड, शिवदास पाटील, गणेश पाटील, शरद पाटे, प्रवीणजी ब्राह्मणे, भैय्या पाटील, योगेश जाधव, सुमीत पाटील, सुषमा पाटील, विकास तात्या पाटील, प्रशांत पवार, शशिकांत येवले, डॉ. प्रमोद पाटील, इम्रान सय्यद, राजेंद्र पाटील, युवराज आबा पाटील, तालूका प्रमुख शरद पाटील, नगरसेवक शीतल सोमवंशी, बंडू चौधरी, भडगाव तालुक्यातील पदाधिकारी विकास पाटील, राजेंद्र पाटील, युवराज पाटील, प्रशांत पवार, पाचोरा तालुक्यातील पदाधिकारी जितेंद्र जैन, संदीप राजे पाटील, मोहित पाटील, विशाल राजपूत, देवराम लोणारी, पप्पू महाजन, बापू हटकर, विशाल पवार, ईश्वर मराठे, महेंद्र पवार सुनील पवार योगेश शेळके, सुमीत खर्चाणे, मंदाताई पाटील, उर्मिला शेळके, बेबाताई पाटील, स्मिता बारावकर, जया पवार, सुषमा पाटील, मालती हटकर, संगीता पगारे, लता वाघ, सोनवणे प्रीती ,सुनंदा महाजन, कल्पना पाटील, जया सुरवडकर, हे उपस्थित होते. यावेळी सौ. सुनीता ताई पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.