पाचोरा तालुक्यात बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ.आरोग्य विभाग कुंभकर्ण झोपेत. भाग (१)

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०९/२०२१
पाचोरा शहरासह तालुक्यातील काही खेडेगावात व परिसरात सध्या बहुतांश भागांमध्ये कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण न घेता कोणतीही पदवी व डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू असून हे बोगस डॉक्टर मुन्नाभाई एमबीबीएसच्या तोऱ्यात दवाखाना थाटून लोकांची दिशाभूल करत आहेत.
एका बाजूला बोगस डॉक्टर दिवसाढवळ्या बिनधास्तपणे उपचार करत रुग्णांच्या जीवाशी खेळत असतांनाच दुसरीकडे मात्र जिल्हा वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी, गावागावातील आरोग्य विभागाचे जबाबदार कर्मचारी तसेच सरपंच, पोलीस पाटील, या गंभीर बाबीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकातुन केला जात आहे. अश्या मुन्नाभाई एमबीबीएस डॉक्टरांवर कडक कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस बोगस डॉक्टरांच्या संखेत भर पडत आहे.
या बोगस डॉक्टरांविरुद्ध शासन निर्णय असून सुद्धा आरोग्य अधिकारी कुठलीच कारवाई करीत नाही महाराष्ट्र मेडिकल रेक्टिफिकेशन कायदा कलम ३३ आणि ३६ अंतर्गत ह्या बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे, व ३६ कलमांतर्गत डॉक्टर ही पदवी नावापुढे वापरत असल्यास एक ते तीन वर्ष सजा किंवा दंड आकारला जातो. डॉक्टर असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी कलम ४३९ ४२० अंतर्गत ७ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.
म्हणून संबधित जबाबदार अधिकाऱ्यांनी याबाबतची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी म्हणजे गोरगरिबांच्या जिवाशी होणारा खेळ थांबेल.
पुढील बातमी.
बोगस डॉक्टर बनले दलाल, रुग्ण होत आहेत हलाल.