नराधम बापाचे पोटच्या मुलीसोबत अश्लील चाळे, पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०९/२०२२

कुटुंबासाठी असणारी धडपडी वृत्ती, अपरिमित कष्ट करणारे, मुलांसाठी हवा तितका खर्च करून स्वता साधेपणात समाधानी राहणारा, आयुष्यभराची पुंजी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी साठवून ठेवणारा दुसरं कोण असणार तो फक्त बाबाच. बाप या दोन अक्षरी शब्दातसुद्धा कितीतरी तरी मायेचा ओलावा दडला आहे. म्हणून म्हणतात बाप बापच असतो तो देवापेक्षा मोठा असतो परंतु या विश्वासाला व नात्याला काळीमा फासणार नराधम बाप आज पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावात आढळून आला असून या नराधम बापाचे कृत्य ऐकून तालुक्यात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच या नराधमाला भरचौकात आणून फटकारे मारावेत तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून जास्तीत, जास्त सजा सुनावली जावी अशी मागणी केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा हादरून सोडणारी घटना घडली असून पोटच्या मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधम बापाला पाचोरा पोलीसांनी अटक केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरण पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एक गावात पिडीत मुलगी ही तिची आई व वडीलांसह वास्तव्याला आहे. आई मोलमजूरी व बकऱ्या चारण्याचे काम करून उदरनिर्वाह चालवते. पिडीत मुलगी ही १५ वर्षाची असल्याने ती देखील घरकामात हातभार लावते. २०१९ मध्ये अल्पवयीन मुलगी १२ वर्षाची असतांना नराधम बाप हा घरी कुणीही नसतांना मोबाईलवर कपडे काढलेले अश्लिल व्हिडीओ दाखवत होता. हा प्रकार किळसवाना प्रकार असला तरी बाप असल्यामुळे मुलीने काहीही न बोलता सर्व सहन केले. हा प्रकार आजपर्यंत सुरूच होता. मुलगी कुणालाही काही सांगत नाही म्हणून या नराधम बापाची मजल वाढतच गेली व याच दरम्यान मंगळवारी दिनांक १३ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी पिडीत मुलीची आई ही बकऱ्या चारण्यासाठी बाहेर गेली होती त्यामुळे मुलगी घरी एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत या जन्मदेत्या बापानेच पोटच्या मुलीसोबत अशोभनीय वर्तन केले परंतु मुलगी घरी असल्याने तीने मुकाट्याने रहाणे पसंत केले व आई घरी केव्हा येईल याची वाट पहात बसली.

दुपारी बकऱ्या चारून तिची आई घरी आल्यावर पिडीत मुलगी भेदरलेल्या अवस्थेत घराच्या कोपऱ्यात बसून रडत असल्याचे दिसून आले. तीला पाहून तू का रडतेस असे आईने विचारताच मुलीच्या वेदनांचा बाध फुटला व तो ओक्साबोक्शी रडु लागली आईने तीला धिर देत विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर तिने आपल्यावर घडलेला सर्व प्रकार आईसमोर कथन केला. मुलीसोबत घडलेला प्रसंग ऐकल्यावर आईच्या पायाखालची वाळू सरकली. व तीने पिडीत मुलीसह थेट पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या व तीच्या आईच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करुन घेत नराधम बापाला पोलीसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस उपअधिक्षक भरतजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या