ज्ञानाचा हा तिसरा डोळा, वरिष्ठ लिपिकाचा धंदा काळा. शिक्षकाच्या पदमान्यतेसाठी २ लाख ३० हजारांची मागणी करणारा लिपिक अडकला जाळ्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/१२/२०२१
जळगाव जिल्हापरिषद माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे याला शिक्षकाच्या पदमान्यतेसाठी २ लाख ३० हजार रुपये लाचेची मागणी केली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज अटक केल्याने जळगाव जिल्हापरिषदेसह, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार यांचा लहान भाऊ शहरातील आर.आर.विद्यालय येथे सन-२०१४ पासुन शिक्षक पदावर विनाअनुदानीत तत्वावर नोकरीस आहेत. त्यांच्या विनाअनुदानीत तत्वावरुन अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक पदी नियुक्तीस मान्यता मिळावी म्हणून अनुकूल अहवाल तयार करून पाठविण्याच्या मोबदल्यात योगेश खोडपे (रा.ममता राणे नगर, वाघ नगर, जळगांव ) याने तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष २,३०,०००/-रुपये लाचेची मागणी केली. म्हणुन त्यांचेविरुध्द आज जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीने आधी १२ फेब्रुवारी २०२१ रोजी या रकमेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. परंतु लाच देणे हा गुन्हा असल्याने व अश्या लबाड लांडग्याचे पितळ उघडे पाडण्यासाठी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार सापळा रचून आज योगेश खोडपेला रंगेहात अटक करण्यात आली आहे..
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे नाशिकचे पोलीस अधीक्षक मा.श्री. सुनील कडासने, पोलिस अधीक्षक मा.श्री. विशाल गायकवाड, प्रभारी अपर अधीक्षक मा.श्री. सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव ए.सी.बी.चे पोलीस उपअधीक्षक मा.श्री. शशीकांत पाटील, पोलिस निरीक्षक मा.श्री. संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार मा.श्री. दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार मा.श्री. सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, कॉ प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
*@ दुरध्वनी क्रं. ०२५७-२२३५४७७
*@ मोबा.क्रं. ८७६६४१२५२९
*@ टोल फ्रि क्रं. १०६४
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~