उत्राण येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ.माया खैरनार यांनी राबविले स्वच्छता अभियान.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन. (पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२१
ग्रामपंचायतीचे निकाल लागल्यापासून सत्ता व खुर्ची अबाधित रहावी म्हणून काहींना आरक्षणाचे वेध लागले असून काही ठीकाणी निवडून आलेले सदस्य ऐनवेळी फुटतील का या भितीने निवडून आलेल्या सदस्यांना सहलीला रवाना केले आहे.
परंतु एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक २ मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ. माया गौतम खैरनार यांनी कश्याचाही मोह मनात न ठेवता जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून निवडून येताच ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम राबवून गावात स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आज गावातील स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळा येथे जेसीबी आणून स्वच्छता अभियानास सुरुवात केली. त्यांच्या या कार्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.