लढण्याची धमक ठेवा यश हमखास मिळेल – श्री. ईश्वर कातकडे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०९/२०२१
पाचोरा येथे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी पाचोरा येथील श्री.शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात माजी आमदार मा.श्री.दिलीप भाऊ वाघ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराच्या समारोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना पाचोऱ्याचे डी.वाय.एस.पी.मा.श्री.ईश्वरजी कातकडे म्हणाले की, लढण्याची धमक असेल तर यश हमखास मिळते, विनासायास काहीच साध्य होत नाही यासाठी स्वप्ने मोठी बघा आणि ते सत्यात उतरवा. पोलीस या खात्यामध्ये गुणवंतांना हमखास यश मिळते यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजेत, यश हे जात, धर्म, पंथ, श्रीमंत-गरीब बघत नसते तर योग्य प्रयत्न करणाऱ्यांना हमखास साध्य होते असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मा. श्री. संजय वाघ यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अडचणी येत असतील त्यांच्या पाठीशी आमची संस्था केव्हाही उभी असेल. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन मा. श्री. व्ही. टी. जोशी, श्री. शशिकांत चंदिले, श्री. सतीश चौधरी, प्रा. राजेंद्र चिंचोले, डॉ. बी. एन. पाटील, प्रा. जी. बी. पाटील, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. बी. तडवी, प्रा. के. एस. इंगळे, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. स्वप्नील भोसले आदी उपस्थित होते. या शिबिरात मार्गदर्शन करणारे प्रा. डॉ. दिनेश तांदळे, प्रा. जी. एन. पाटील, श्री. योगेश शिंपी, श्री. डी. बी. कोळी, श्री. दीपक पाटील, डॉ. सचिन भोसले, श्री. महेश चिंचोले, श्री. एल. जी. कांबळे यांचा संस्थेचे चेअरमन मा. श्री. संजय वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिबिरातील निलेश राठोड, चेतन महाजन, साक्षी पाटील, रूपाली पाटील, इंदिरा देवरे, यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने आयोजित स्पर्धांचे पारितोषिकही वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. माणिक पाटील यांनी मानले.