जळगाव जिल्ह्यात आज १२२३ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १३ बाधितांचा मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०३/२०२१
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट ७.३६ टक्के इतका.
जळगाव जिल्ह्यात स्वॕब घेतलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा १२२३ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर २४८ ,जळगाव ग्रामीण १३, भुसावळ १३५,अमळनेर १५३, चोपडा ३३८ ,पाचोरा ०३, भडगाव ३० ,धरणगाव ३१,यावल ४५,एरंडोल २९, जामनेर ६५, रावेर १९,पारोळा ३४,चाळीसगाव २३,मुक्ताईनगर २९, बोदवड २७ आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे एकूण १२२३ रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात रूग्ण 908बरे झाले असून आतापर्यंत एकूण ६८९८१ रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या १०२७९ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ८०७८६ झालेली आहे. जिल्ह्यात आज १३ रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १५२६ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.