शिक्षक दिन पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ शिक्षकांची नावे जाहीर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०९/२०२१
शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणार्या शिक्षक पुरस्कारासाठी जळगाव जिल्ह्यातील १५ प्राथमिक शिक्षकांची नावे जाहीर झाली आहेत. जिल्हा परीदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित शिक्षकांच्या नावांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविल्यानंतर त्यास विभागीय आयुक्तांनी या प्रस्तावांना मंजूरी दिली असून
जिळगाव जिल्ह्यातील पुरस्कार्थी शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे
दिनेश रमेश मोरे (जि.प.मुलींची शाळा, मारवड, ता.अमळनेर), मनिषा सुपडू पाटील (जि.प.प्राथमिक शाळा, वढवे, ता.भडगाव), नामदेव शालिग्राम महाजन (जि.प.प्राथमिक शाळा, मोंढाळे, ता.भुसावळ), योगेश मुरलीधर घाटे (जि.प.प्राथमिक शाळा, दादानगर नाडगाव ता. बोदवड), ओमप्रकाश रतन थेटे (जि.प.प्राथमिक शाळा, पिंपळगाव प्र.दे., ता. चाळीसगाव), सोमनाथ खंडु देवराज (जि.प.प्राथमिक शाळा, वेले-आखतवाडे, ता.चोपडा), माधुरी उत्तम देसले (जि.प.प्राथमिक शाळा, दोनगाव खुर्द, ता.धरणगाव), पद्माकर काळु पाटील (जि.प.प्राथमिक शाळा, टाकरखेडा, ता. एरंडोल), मोनिका विजय चौधरी (जि.प.प्राथमिक शाळा, वडली, ता. जळगाव), माया प्रकाशराव शेळके (जि.प.प्राथमिक शाळा, खादगाव, ता. जामनेर), विकास ज्ञानदेव पाटील (जि.प.प्राथमिक शाळा, उच्च टाकळी ता.मुक्ताईनगर), सुभाष संतोष देसले (जि.प.प्राथमिक शाळा, चिंचपुरे ता.पाचोरा), सीमा विठ्ठल पाटील (जि.प.प्राथमिक शाळा, हिवरखेडे खुर्द, ता.पारोळा), गजाला तबस्सुम सैय्यद असगर अली (जि.प.उर्दू मुलींची शाळा क्रमांक एक, रावेर), संदीप सुरेश पाटील (जि.प.प्राथमिक शाळा, डांभूर्णी, ता.यावल) यांना शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.