वरखेडी भोकर येथे चार वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी जवळील भोकरी येथे दिनांक १४ नोव्हेंबर रविवार ते दिनांक १५ नोव्हेंबर सोमवारचे रात्री अलिजा इम्रान कांकर वय वर्षे (४) ही आपल्या आई सोबत झोपली असतांना रात्री झोपेतच तीला विषारी सापाने चावा घेतल्याने तीचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सोमवारी सकाळी चार वाजेच्या सुमारास अलिजा ही झोपली असतांना तिला काहीतरी चावल्याचे भास झाला म्हणून ती झोपेतून उठून बोबड्या आवाजात आईला सांगू लागले की भैय्या मुझे काट रहा है. असे सांगितल्यावर त्याच्या आईवडिलांनी उठून पाहिले असता, तिच्या जवळ दोन साप आढळून आले, पैकी एका सापाने अलिजा हिच्या गळ्याजवळ चावा घेतलेला दिसून आला.
ही घटना पाहताच कुटुंबीयांची दातखीळ बसली व आरडाओरडा करुन मदतीसाठी धावा केला. हा गोंगाट ऐकून भोकरी गावातील शेजारी मदतीसाठी धावले. समोर पाहिले असता अलिजा हिच्या अंथरुणावर दोन साप आढळून आले पैकी एका सापाने अलिजा हिच्या गळ्याजवळ घट्ट चावा घेतलेला होता.
आता याच्यावर काय करावे म्हणून त्यांनी गावातील सर्पमित्राला बोलून साप पकडण्यासाठी विनंती केली. एका बाजूला साप पकडणे सुरू होते तर दुसऱ्या बाजूला अलिजावर उपचार करण्यासाठी धावपळ सुरू होती. परंतु नशिबाला वेगळेच काही मान्य होते तिच्यावर उपचार करण्याची धावपळ सुरू असतांनाच सर्प विषारी असल्यामुळे तिचा काहीवेळातच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्ती केली केली जात असून भोकर व वरखेडी येथील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकच गर्दी केली होती.
(कॉपी पेस्ट पत्रकारांना नम्र विनंती की त्यांनी सत्यजीत न्यूजच्या बातम्या घरबसल्या कॉपी पेस्ट करु नये व करायच्याच असतील तर मी आतापर्यंत प्रसारित केलेल्या काही कपडे फाडू बातम्यानांही प्रसिद्धी देऊन समाजहित जोपासावे)