सापडलेला मोबाईल पो.ना.राकेश खोंडे यांनी केला परत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०७/२०२१
पाचोरा येथील पुनगाव रोड परीसरात सागर सुरेश पाटील रा.पाचोरा या तरूणाचा मोबाईल पुनगाव रस्त्यावर दुपारी ०२:३० ते ०३:०० वाजे दरम्यान हरवला होता.
पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पो.ना.राकेश खोंडे व पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. विशाल हटकर, हे दोघे मोटारसायकल ने पुनगाव रस्त्यावरून जात असतांना त्यांना रस्त्याच्या कडेला अँड्रॉइड मोबाईल पडलेला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मोबाईल उचलून बघितल्यावर तो अँड्रॉइड मोबाईल बंद होता.
सदर मोबाईल बंद असल्याने तो मोबाईल कोणाचा आहे ओळखणे शक्य झाले नाही. त्यामुळे सापडलेला मोबाईल पो.ना.राकेश खोंडे व विशाल हटकर यांनी प्रामाणिक पणाने पाचोरा पोलीस स्टेशनला जमा केला होता.
याच दरम्यान सागर सुरेश पाटील या तरूणाने मोबाईल हरवल्याची तक्रार पाचोरा पोलीसात दाखल केलेली होती.
पोलीसांनी सागर पाटील यास पोलिस स्टेशनला बोलाऊन घेत मोबाईलची ओळख पटवण्यासाठी बील तपासुन खात्री केल्यानंतर तो सापडलेला मोबाईल सागर पाटील याचाच असल्याचे सिध्द झाल्यावर पाचोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विजया वसावे, ठाणेअंमलदार पो.ना.सुर्यकांत नाईक, पो.ना.राकेश खोंडे, प्रशांत पाटील, विशाल हटकर यांच्या समक्ष सागर पाटील याला त्याचा मोबाईल देण्यात आला.
मोबाईल मिळाल्याबद्दल व पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल सागर पाटील याने पो.ना.राकेश खोंडे, विशाल हटकर व पाचोरा पोलिसांचे आभार मानले.