बहुलखेड्याच्या बोगस डॉक्टरची अशीही हुशारी, दवाखाना बंद करुन उपचार करतो घरोघरी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०८/२०२३
सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा गावात मुन्नाभाई एम. बी. बी. एस. करतोय रुग्णांच्या जिवाशी खेळ. या शीर्षकाखाली २३ जूलै २०२३ रविवार रोजी सत्यजित न्यूज कडून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बहुलखेडा गावातील डॉक्टरांने आपल्या गाशा गुंडाळून पोबारा केला होता. तसेच सत्यजित न्यूजची दखल घेऊन जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी मा. श्री. श्रीनिवास सोनवणे यांनी तालुका पर्यवेक्षक मा. श्री. एच. एल. दुधे. आरोग्य सेवक मा. श्री. डी. ए. झोंड. यांना सोबत घेऊन थेट बहुलखेडा गावात जाऊन दवाखाना असल्याचे ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन ग्रामस्थांची भेट घेऊन बोगस डॉक्टर विषयावर सविस्तर चौकशी केली असता बहुलखेडा गावातील दर्शविलेल्या ठिकाणी संबंधित बोगस डॉक्टर दवाखाना चालवत होता परंतु सत्यजित न्यूजला बातमी आल्यानंतर बोगस डॉक्टरने पोबारा केला असल्याचे सांगितले जात होते.
मात्र याच मुन्नाभाई एम. बी. बी. एस. डॉक्टरने बहुलखेडा गावातील काही महत्त्वाच्या व प्रतिष्ठित लोकांना हाताशी धरुन बहुलखेडा व वरसाडे तांडा या गावातून पुन्हा आपला वैद्यकीय व्यवसाय सुरु केला असून हा मुन्नाभाई बिनधास्तपणे ॲलोपॅथी औषधांचा वापर करत साधी, साधी लक्षणे जाणवली तरी रुग्णांकडून पैसे उकळण्यासाठी नको ते वर्णन करुन गरज नसतांना इंजेक्शन देणे, सलाईन लावणे, हकनाक रक्त, लघवी, थुंकी तपासणी करायला लावून संबंधित लॅबोरेटरी संचालकांकडून कमीशन लाटणे तसेच वारेमाप औषधे लिहून देत औषधी विक्रेत्यांकडून कमीशन लाटणे असे प्रकार बिनधास्तपणे व सर्रासपणे करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या बोगस डॉक्टरने बहुलखेडा गावात पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरु केल्यापासून सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण बोगस डॉक्टरच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एखाद्या रुग्णांच्या जीवावर बेतू शकते अशी भिती सत्यजित न्यूज कडे बोलुन व्यक्त केली आहे. याची दखल घेऊन सत्यजित न्यूज लवकरच या बोगस डॉक्टरचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करणार असून गावातील पोलीस पाटील, सरपंच, आरोग्य सेवक यांनी या बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी योग्य ती माहिती व ग्रामपचायतीने ठराव करुन जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करणे
गरजेचे असल्याने संबंधित जबाबदार घटक या बोगस डॉक्टरांच्या बाबतीत काहीही कारवाई करत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.