अनोळखी महिलेची ओळख पटवण्याचे अवाहन.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०२/२०२२
पाचोरा शहरात भिक मागून आपला उदरनिर्वाह करणारी एक वयोवृद्ध महिला वय अंदाजे ६५ वर्षे दिनांक २८ जानेवारी २०२२ शुक्रवार रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास आजारी असल्याने अत्यवस्थ अवस्थेत आढळून आली होती. म्हणून तिला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान संबंधित अनोळखी महिला मृत्यू झाल्याणे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. अमित साळुंखे यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला खबर देऊन संबंधित महिलेची ओळख पटवण्यासाठी सांगितले याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर महिलेची ओळख पटण्यासाठी पाचोरा पोलिस प्रयत्न करत असून सदरील फोटोतील महिला कुणाच्याही ओळखीची किंवा नातेवाईक असल्यास पाचोरा पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असे आवाहन पाचोरा पोलिस स्टेशनतर्फे पोलिस नाई सचिन अशोक निकम यांनी केले असून
०२५९६-२४०९३३ (पाचोरा पोलीसस्टेशन), भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यासाठी सांगितले आहे.