अशोकदादा चौधरी व वंदनाताई चौधरी यांची गौरी ग्रुपला सदिच्छा भेट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/१२/२०२०
शेंदुर्णी जिनिंगचे संचालक अशोकदादा चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव वंदनाताई चौधरी यांनी वावडदा येथील गौरी उद्योग समूह आणि खान्देश मराठा कुणबी पाटील वधू-वर सूचक केंद्रास गुरुवार, दि.१० डिसेंबर रोजी सदिच्छा भेट दिली.
या वेळी दादा व ताईंनी गौरी उद्योग समूहाची माहिती घेतली. तसेच खान्देश मराठा कुणबी पाटील वधू-वर सूचक केंद्राच्या कार्याची पद्धत जाणून घेतली. मराठा समाजातील पोटजाती एकत्रीकरण, विनाहुंडा लग्न, विवाहित जोडपे, त्यांचे कौटुंबिक वाद, अनेकांचे घटस्फोट टाळून दांपत्यांचे केलेल मनोमिलन, समाजातील गरजू मुलं, मुलींच्या शिक्षणाची स्वीकारलेली जबाबदारी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकटग्रस्ताना दिलेला मदतीचा हात, रुग्णांना उपलब्ध करुन दिलेली आरोग्य सेवा, परप्रांतीयांना दिलेला आश्रय आदी समाजकार्याची माहिती मराठा कुणबी पाटील वधू-वर सूचक केंद्र व गौरी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, समाजभूषण पुरस्कारप्राप्त बापूसाहेब सुमित पाटील यांनी माहिती दिली. या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक ताई व दादांनी केले. त्यांनी समाजकार्यास सहकार्याचे आश्वासन दिले. तसेच या भेटीप्रसंगी ताईं व दादांनी राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेच्या सामाजिक कार्याची देखील माहिती घेतली. त्यांनी समाजहिताच्या कार्याची दखल घेत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर ताईंनी संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.