पाचोरा शहरात ओमायक्रॉन आजाराचा फैलाव होवु नये म्हणुन आनंदमेळा हा तात्काळ बंद करण्यात यावा.(हरीभाऊ पाटील.)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक-०७/१२/२०२१
पाचोरा शहरात ओमायक्रॉन आजाराचा फैलाव होवु नये म्हणुन पाचोरा शहरात आज रोजी सुरू असलेला आनंदमेला हा तात्काळ बंद करून तालुकावासियांच्या जिवाची काळजी पोलिस प्रशासनाने तसेच महसुल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी मा.श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील. संस्थापक अध्यक्ष
बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, पाचोरा यांनी केली आहे.
देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉन या आजाराने थैमान घातले आहे. या संसर्गजन्य ओमायक्रॉन आजाराची लागण होऊ नये हा विचार डोळ्यासमोर ठेवुन शहरात व तालुक्यात कोठे ही मोठी गर्दी जमा होणार नाही याची दक्षता पोलिस/महसूल प्रशासनाने घेण्याची वेळ आली आहे.
असे असल्यावरही पाचोरा शहरात आनंद मेळा भरवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी तात्काळ रद्द करुन आनंद मेळावा त्वरित बंद करण्यात यावा कारण या आनंद मेळ्याव्याचा आनंद घेण्यासाठी लहान, लहान मुलांसह घरातील इतर सदस्य या ठिकाणी एकच गर्दी करत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होत असून कोरोना व ओमायक्रॉन या आजाराचा फैलाव होऊनये म्हणून घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत असल्याने हा आनंद मेळावा त्वरित बंद करण्यात यावा अशी मागणी श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील.संस्थापक अध्यक्ष बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, पाचोरा यांनी केली आहे.