माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन घेतली कोरोना लस.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०६/२०२१
कोव्हिड लसीकरण सुरु झाल्यापासून आजपर्यंत ही लस घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना शासनाने जाहीर केलेल्या आरोग्य विभागाचे दवाखान्यात किंवा इतर ठरलेल्या ठिकाणी जाऊन लस घ्यावी लागत आहे. लसीकरण करण्यास सुरवात झाली तेव्हा लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्यासाठी सर्वसामान्य जनता जीवाचे रान करुन लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असतांनाच दुसरीकडे काही लोकांनी आपपल्या परीने आपल्याजवळ असलेल्या बळाचा वापर करत वैद्यकीय पथकाला घरी बोलावून स्वताचे लसीकरण करुन घेतले. मात्र नंतर याबाबत जनतेतून असंतोष पसरु लागला व हा प्रकार थांबला यासर्व गोष्टींना आडफाटा देत. पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवत सर्वसामान्य नागरीकासारखे लसीकरण करुन घेण्यासाठी,
आज दिनांक १९ जून शनिवार रोजी दुपारी १२:०० वाजता पाचोरा-भडगाव मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार लोकनेते दिलीपभाऊ वाघ यांनी सर्वसामांन्य नागरिकाप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडी येथे येऊन नियमाप्रमाणे नावनोंदणी करून कोरोना लसीकरण करुन घेतले.
तसेच सर्व पात्र नागरिकांनी लस घ्यावी, लसीचे काहीही दुष्परिणाम नसून आपल्या हिताचीच असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. तसेच वरखेडी प्रार्थमिक आरोग्य केंद्राचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी मा.श्री.डॉ.शेखर पाटील व त्यांच्या सर्व कर्मचारी यांनी कोरोना सारख्या भिषण संकटात स्वताच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णसेवा केली या उत्कृष्ट कामकाजाबद्दल त्यांचे अभिनंदन केले
यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष मा.श्री. शालिग्राम मालकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मा.श्री. रणजित पाटील सर, जिल्हा प्रवक्ता खलील दादा देशमुख, वरखेडीचे पितामह मा.श्री. डिंगबर दादा पाटील, भोजे येथील मा.श्री. शीतल पाटील, वानेगावचे मा.श्री. बंडू नाना पाटील, सावखेड्याचे मा.श्री. जयसिंग कारभारी पाटील, रशीद उखरडू माजी पंचायत समिती सदस्य, डॉ अल्ताप शफी माजी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य अलीम रुस्तम, आसिफ इस्माईल, आंबेवडगाव चे पत्रकार दिलीपभाऊ जैन, वरखेडीचे पत्रकार मा.श्री. रवी शंकर पांडे, डॉक्टर मयुर पाटील, डॉक्टर दिपाली ताई सोनवणे औषध निर्माण अधिकारी श्री. साळुंखे, आरोग्य सहाय्यक चौधरी, आरोग्य सेविका श्रीमती चव्हाण, आरोग्य सेविका ए.सी. पाटील, आरोग्य सेवक श्री. योगेश पाटील व राजेंद्र भिवसाने प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. देशमुख, दिनेश चौधरी शिपाई गौरव जाधव वाहन चालक सफाई कामगार श्रीमती खंडारे व आशा स्वयंसेविका यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिलीपभाऊ वाघ यांनी सर्वसामान्यांनप्रमाणे रीतसर नंबर लावून लस घेतल्याने सर्वच स्तरातून दिलीप भाऊंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून जनसामान्यांचे असामान्य नेतृत्व दिलीपभाऊ वाघ हेच असल्याचं त्यांच्या कृतीतून दिसून आलं. लसीकरणच्या वेळी प्रार्थमिक आरोग्य केंद्रासमोर सामाजिक अंतर राखत त्यांचे चाहते भेटण्यासाठी आतुरतेने वाट पहात होते. लसीकरण करुन घेतल्यानंतर मा.श्री. दिलीप वाघ यांनी वरखेडी बसस्थानक परिसरात थांबून आपल्या कार्यत्यांनसोबत संवाद साधून शेतीकामे, बि, बियाणे, खते मिळतात की नाही तसेच पिक कर्ज घेतांना काही आडणी येत आहेत का असे विचारात सगळ्यांनी लसीकरण करुन घ्यावे असे सुचवले.