पिंपळगाव हरेश्वर येथे कृपाराम मंदिरात पूर्णवाद महोत्सव साजरा.
दिपक मुलमुले.(पिंपळगाव हरे.)
दिनांक~११/०६/२०२१
श्री क्षेत्र पारनेर ७० वा पूर्णवाद महोत्सव.
पूर्णवाद वर्धिष्णू परमपूज्य सदगुरु श्री.विष्णु महाराज पारनेरकर यांचे आज्ञेनुसार व आशिर्वादाने दरवर्षी पूर्णवाद महोत्सव साजरा करण्यात येत होता. परंतु मागील वर्षीपासून कोरोनासारख्या महामारीचे थैमान वाढल्याने पूर्णवाद महोत्सव साजरा करण्यासाठी अडचणी आल्या होता परंतु यावर्षी देवाच्या कृपाआशीर्वादाने कोरोनाचे संकट कमी झाले असल्यामुळे यावर्षी पूर्णवाद वर्धिष्णू परमपूज्य सदगुरु श्री.विष्णु महाराज पारनेरकर यांचे आज्ञेनुसार व आशिर्वादाने यावर्षी ७० वा पूर्णवाद महोत्सव महोत्सव कोरोनाची नियमावली पाळत सामाजिक अंतर ठेवून मोठ्या साजरा करण्यात आला.
या महोत्सवाचे निमीत्ताने पिंपळगाव हरेश्वर येथील परमपूज्य सदगुरु डॉ.श्री.रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या
पूर्णवाद महोत्सवात सर्वोत्कृष्ट मंदिर म्हणून कृपाराम मंदिरास नामांकन मिळालेल्या मंदिरात कृपाराम मंदिर(जीवन कला मंडळ) पिंपळगाव हरेश्वर तर्फे दिनांक ३ जून २०२१ गुरुवार वैशाख कृष्ण नवमी पासुन दिनांक १० जुन २०२१ गुरुवार वैशाख कृष्ण अमावस्या पर्यंत सदगुरु आज्ञेनुसार पूर्णवाद महोत्सव साजरा करण्यात आला.
या महोत्सवात दररोज सकाळी ८.०० ते १०.०० श्री. गणेश व श्री सद्गुरु रामचंद्र महाराज पारनेरकर यांचे मुर्तींचे अभिषेक, षोडशोपचार पुजन , त्यानंतर सदगुरु रामचंद्र महाराज पारनेरकर यांचे ओविबद्ध सगुण चरित्र पारायण, दुपारी १२.०० वा.महानैवैद्य व आरती.सायंकाळी श्री. रामरक्षा स्तोत्र पठण, गुरूवार पुजन व पंचोपचार पूजा व आरती असे नियोजन करण्यात आले होते.
या पूर्णवाद महोत्सव सोहळ्यात ॲड.श्री अरुण नारायण कुलकर्णी,सौ.रंजना अरुण कुलकर्णी,कु.सुषमा सुधाकर जैन,व चि.विवेकानंद शरद कापसे यांनी ओविबद्ध सगुण चरित्र पारायण केले.महोत्सवाचा शेवट प्रार्थना, नामजप व प्रसादाचे वाटप करून करण्यात आला. या महोत्सवात पूर्णवाद परीवारातील गुरुबंधु, भगिनी व परिसरातील भाविक भक्त कार्यक्रमाला उपस्थित होते.