कुऱ्हाड, लोहारा व कळमसरा गाव परिसरातही दबंग कारवाई करण्यात यावी सुज्ञनागरीकांची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०५/२०२१
[ही बातमी लिहितांना आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नसून लॉकडाऊच्या कालावधीत हाताला काम नसतांनाही घराघरात उपासमारीची वेळ आली असतांनाच एका बाजूला जीवनावश्यक सामान व वस्तुंची दुकाने बंद असून दुसरिकडे अवैधधंद्यांचा महापूर आला असल्याने अनेक संसार उध्वस्त होत आहेत.]
(या अवैधधंद्यांच्या अड्ड्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा असल्याने या ठिकाणाहून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो हे निश्चित)
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्ववर पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक मा.श्री. लीलाधर कानडे यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, अक्षय तृतीया तसेच रमजान ईदचा पवित्र सण लक्षात घेऊन शांतता सुव्यवस्था नांदणेकामी व लॉकडाऊचे नियम पाळले जावेत म्हणून कारवाई सुरु केली आहे.
या कारवाईत पिंपळगाव हरेश्वर, शिंदाड, वरखेडी, लोहारी, वडगाव कडे, वडगाव अंबे या गावांसह इतर गावात आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन नियमबद्ध वाहन चालवणे, हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे, वाहन चिलवण्याचा परवाना नसतांना वाहन चालवणे यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन वाहतुकीला शिस्त लावली अवैधदारु विक्री, सट्टापेढी, जुगाराच्या अड्ड्यावर धाडसत्र राबवून कारवाईचा बडगा उगारल्याने अवैधधंदे करणारांच्या उरात धडकी भरली आहे.या कारवाई बाबत जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
या कारवाईत पी.एस.आय.मा.श्री.डीगंबर थोरात, पो.हे.कॉ. मा.श्री.रणजित पाटील, मा.श्री.विजय माळी.मा.श्री.अरुण राजपूत,मा.श्री.संदीप राजपूत व मा.श्री. दिपक पाटील. यांनी अथक परिश्रम घेतले होते.
परंतु आजही बऱ्याचशा गावातून अवैधधंदे सुरु असून जुगाराचे अड्डे सुरु आहेत. अवैधधंद्यांच्या अड्ड्यावर एकत्र गर्दी जमत असून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्यासाठी हे मोठे कारण ठरू शकते म्हणून या अवैधधंद्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी होत असून
विशेष करुन कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक,लोहारा व कळमसरा गावात अद्यापही कोणत्याही अवैधधंदे करणारांच्या अड्ड्यावर कारवाई होत नसल्याने नव्यानेच आलेले पोलीस निरीक्षक मा.श्री. लीलाधर कानडे यांनी वरील गावातही कारवाई करुन अवैधधंदे बंद करुन सर्वसामान्य जनतेला सुखासमाधानाने जगता येईल असे वातावरण निर्माण करावे अशी अपेक्षा या परिसरातील माता भगिनी व सुज्ञनागरीकांनी व्यक्त केली आहे. कारण कालच लोहारा येथील एका राका परिवाराच्या घरावर जीवघेणा हल्ला झाला असून कुऱ्हाड परिसरात अवैधधंद्यांचा महापूर आला असून चोऱ्यांचे सत्र सुरु आहे.