कुऱ्हाड येथील नाईकनगर रस्त्यावर सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा, मटणाच्या दुकानावर झाली तोबा गर्दी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०४/२०२१
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता शासनाने सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचे आवाहन केले असून प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले असून तोंडावर मास्क नसेल तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे जाहीर केले आहे. व आजच मास्क न वापरल्यामुळे एका व्यक्तीला न्यायालयाने पाच दिवसाची शिक्षा दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
परंतु पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक ही गावे महाराष्ट्राच्या बाहेर आहे की काय असा प्रश्न मनाला पडतो.
कारण वरिल दोघही गावात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून आतापर्यंत काही कोरोनाबाधीतांना आपला जीवही गमवावा लागला असूनही तेथील स्थानिक ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समितीचे सदस्य शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही योजना राबवत नसल्याचे दिसून येते.
याचेच जिवंत उदाहरण म्हणजे कुऱ्हाड गावाजवळ रामेश्वर तांडा रस्त्यावर एका झाडाखाली मटण विक्रीच्या दुकानावर आसपासच्या जवळपास आठ खेड्यातील लोकांनी दिवसभर मटण घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून येत होते तसेच गावपरिसरातील दारुच्या अड्यावरही अशीच गर्दी होती.
कोरोनाच्या कालावधीत सकस आहार घेणे योग्य आहे. परंतु मटण खरेदी करतांना सोशल डिस्टेंसिंग पाळत तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्यावरही या ठिकाणी सगळे कायदे धाब्यावर बसवल्याचे दिसून येत असल्याने सुज्ञनागरीकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत काही लोकांच्या सैराट वागण्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असून बोटावर मोजण्याइतक्या लोकांमुळे सर्वसामान्य जनतेला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याचे मत व्यक्त करत सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडवणारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.